Petrol Diesel Price Today : देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग; वाचा तुमच्या शहरातील नवे दर काय?

87
Petrol and diesel prices with a fuel pump and graph
Current trends in petrol and diesel prices.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price) हा देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी आणि अर्थकारणाशी थेट जोडलेला अत्यंत संवेदनशील विषय मानला जातो. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये होणारे बदल आणि देशांतर्गत बाजारपेठेतील इंधनाचे दर यावर प्रत्येक कुटुंबाचे बजेट अवलंबून असते. यामुळेच तेल कंपन्यांकडून दररोज जाहीर होणाऱ्या नवीन किमतींकडे आणि सरकारी निर्णयांकडे संपूर्ण देशातील जनतेचे बारीक लक्ष लागलेले असते.  (Petrol Diesel Price Today)

(हेही वाचा – नागपुरात ‘Love Jihad’चा संतापजनक प्रकार; जवानाच्या पत्नीवर अत्याचार करत जबरदस्तीने केला धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न)

दरम्यान, मंगळवार १६ जूनला देशातील तेल कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) नवीन दर जाहीर केले आहेत. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्यांकडून दररोज सकाळी ६ वाजता इंधनाचे सुधारित दर अपडेट केले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती, डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती, वाहतूक खर्च आणि स्थानिक कर यांसारख्या विविध घटकांवर पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात. त्यामुळे प्रत्येक शहरात इंधनाच्या किंमतींमध्ये थोडाफार फरक पाहायला मिळतो. (Petrol Diesel Price Today)

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूरसह विविध शहरांमध्ये मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. वाहनधारकांसाठी तसेच रोज प्रवास करणाऱ्यांसाठी हे दर जाणून घेणे महत्त्वाचे मानले जाते. तुमच्या शहरात आज १ लिटर पेट्रोल आणि डिझेलसाठी किती रुपये मोजावे लागणार, हे तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात सविस्तर पाहू शकता. खाली दिलेले आजचे ताजे दर तपासून घ्या…

पेट्रोल-डिझेलचा दर 

शहर

पेट्रोल (प्रति लिटर)

डिझेल (प्रति लिटर)

अहिल्यानगर

१०८.११

९४.७८

अकोला

१०८.१५

९४.७२

अमरावती

१०९.५५

९६.०८

छत्रपती संभाजीनगर 

१११.०३

९६.९९

भंडारा

१०९.०८ ९५.६०

बीड

१०८.४४

९५.८४

बुलढाणा १०८.८४

९५.३८

चंद्रपूर

१०८.५४

९५.११

धुळे

१०८.००

९४.५६

गडचिरोली

१०९.५४

९६.०८

गोंदिया

१०९.३२

९५.८३

हिंगोली

१०९.१०

९५.६१

जळगाव

१०८.७७

९५.२८

जालना

१०९.५४

९६.०७

कोल्हापूर

१०८.९४

९५.४७

लातूर

१०९.४२

९५.९३

मुंबई शहर

१०७.५९

९४.०८

नागपूर

१०८.१७

९४.७३

नांदेड

१०९.८१

९६.०८

नंदुरबार

१०९.२५

९५.७५

नाशिक

१०८.८१

९५.३२

धाराशिव

१०८.९३

९५.४६

पालघर

१०८.६६

९५.१४

परभणी

१०९.५६

९६.०९

पुणे

१०८.९२

९५.४३

रायगड १०५.४८

९८.५१

रत्नागिरी १०९.५०

९६.०१

सांगली

१०८.७९ ९५.३२
सातारा १०८.७७

९५.३०

सिंधुदुर्ग

१०९.५५ ९६.०८
सोलापूर १०८.८९

९५.४२

ठाणे १०७.९८

९४.४७

वर्धा

१०८.९६

९५.५०

वाशिम १०९.००

९५.५३

यवतमाळ

१०४.१८

९४.७६

पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol Diesel Price in Marathi) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतात आणि त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर बदलत राहतात. पेट्रोल-डिझेलच्या किमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असते. तर तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पेट्रोल व डिझेलचा आजचा महाराष्ट्रातील इंधनाचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.

(हेही वाचा – Mumbai water crisis : मुंबईकरांनो सावधान! धरणांमधील पाणी पातळी चिंताजनक; पाणी कपातीबाबत पालिकेचा काय निर्णय?)

आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. यासाठी तुम्ही इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.