America-Iran मध्ये शांतता करार, तरीही होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांना धोका का? तज्ज्ञांचे मत काय

52
America-Iran मध्ये शांतता करार, तरीही होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांना धोका का? तज्ज्ञांचे मत काय
America-Iran मध्ये शांतता करार, तरीही होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांना धोका का? तज्ज्ञांचे मत काय

America-Iran अमेरिका-इराणमध्ये शांतता करार झाला आहे. दोन्ही देशांकडून लवकरच करारावर स्वाक्षऱ्या करण्यात येणार आहेत. त्यामुळे आखाती देशात तणाव कमी होणार असून जगाची तेल पुरवठ्याची समस्या कमी होण्याची शक्यता आहे. मात्र युद्धकाळात अमेरिकेच्या नौदलाला रोखण्यासाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीत भूसुरुंग घेतले होते. आता शांतता करार झाल्यावर ही धोकादायक भूसुरुंग हटवणार कोण हटवणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नामुळे जगभरातील लष्करी रणनितीकार चिंतेत आहेत.

अमेरिका-इराण करार होऊनही, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराणच्या भूसुरुंगांनी संकट निर्माण केले आहे. हे प्राणघातक सुरुंग काढल्याशिवाय, जहाजांना या मार्गातून सुरक्षितपणे जाणे अशक्य आहे. जर एखादे जहाज समुद्रातील भूसुरुंगाजवळ आले, तर मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे. अमेरिकेची लष्करी कारवाईचा मार्ग रोखण्यासाठी इराणने जगातील सर्वात महत्त्वाचा तेलमार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये प्रचंड सागरी सुरुंग पेरले होते. आता दोन्ही देश शांतता करार करण्यासाठी एकत्र येत असले तरी, खरा आणि सर्वात धोकादायक प्रश्न हा आहे की या व्यस्त सागरी मार्गात पेरलेले जीवघेणे सुरुंग हटवण्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न आहे.

हेही वाचा – Water Cut : एल निनोचा फटका अन् डोंबिवली-कल्याण-उल्हासनगरला २४ तास पाणीबंदचा झटका

वैशिष्ट्यपूर्ण नौदल भूसुरुंग
या समुद्री मार्गातून भूसुरुंग पूर्णपणे हटवले जात नाहीत, तोपर्यंत त्यातून जाणारे कोणतेही व्यापारी जहाज किंवा तेलवाहू जहाज आत्मघातकी ठरू शकते. होर्मुझची सामुद्रधुनी हा एक सामान्य सागरी मार्ग नाही, ती जगाची आर्थिक नाडी आहे. अलीकडील तणावाच्या काळात, इराणने केवळ हा मार्ग बंदच केला नाही, तर अमेरिकेची घुसखोरी रोखण्यासाठी पाण्याखाली प्राणघातक सुरुंगांचे जाळेही पेरले आहे. हे नौदल सुरुंग वैशिष्ट्यपूर्ण आहेत कारण ते पाण्याच्या पृष्ठभागाखाली लपलेलं. एखादे मोठे जहाज त्यांच्या संपर्कात येताच किंवा त्यांच्या जवळून जाताच, तेथे प्रचंड स्फोट होतो आणि जहाज बुडते. ट्रम्प प्रशासनाने युरेनियम नष्ट करण्यासाठी आणि हा मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी इराणसोबत काम करण्यास सहमती दर्शवली आहे, परंतु हे धोकादायक सुरुंग हटवल्याशिवाय, हा मार्ग पूर्णपणे खुला होणे अशक्य आहे.

अचूक नकाशा उपलब्ध नाही
समुद्रातील भूसुरुंग शोधणे आणि निकामी करणे ही जगातील सर्वात कठीण, खर्चिक आणि वेळखाऊ लष्करी मोहिमांपैकी एक आहे. यासाठी अत्यंत प्रगत सोनार तंत्रज्ञान, पाण्याखालील रिमोट ड्रोन आणि तज्ञ पाणबुड्यांची आवश्यकता असते. गेल्या काही आठवड्यांत इराणने हे सुरुंग इतक्या घाईने आणि गुप्तपणे पेरले आहेत की, त्याचा कोणताही अचूक नकाशा उपलब्ध नाही.

मोठे आव्हान…
तज्ञांच्या मते, समुद्राच्या लाटा आणि जोरदार प्रवाहामुळे हे सुरुंग त्यांच्या मूळ जागेवरून सरकून आंतरराष्ट्रीय जलमार्गाच्या मध्यभागी येऊन पडले असावेत. प्रत्येक सुरुंग स्वतंत्रपणे शोधून तो निकामी करणे किंवा नष्ट करणे हे एक मोठे आव्हान आहे आणि या प्रक्रियेला अनेक महिने लागू शकतात.

या संकटामुळे या धोकादायक मोहिमेचे नेतृत्व कोण करणार यावरून एक नवीन राजनैतिक वाद निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, इराणने हे सुरुंग पेरल्यामुळे, करारानुसार ते हटवण्याची प्राथमिक जबाबदारी इराणचीच आहे. मात्र, असे करण्यासाठी इराणकडे प्रगत सुरुंग-शोधक तंत्रज्ञान आणि संसाधनांची कमतरता आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.