विधानभवनाच्या सुरक्षेचे ‘डिजिटल’ कवच; पावसाळी अधिवेशनासाठी सभापती Ram Shinde यांचे कडक निर्देश

91
विधानभवनात उच्चस्तरीय बैठक, सुरक्षा चर्चा
विधानभवनाच्या सुरक्षेचे 'डिजिटल' कवच; पावसाळी अधिवेशनासाठी सभापती Ram Shinde यांचे कडक निर्देश
  • प्रतिनिधी

Ram Shinde              ​मुंबईच्या विधानभवनात लवकरच सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सोमवारी एक महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक घेऊन अधिवेशनाच्या नियोजनाचा धांडोळा घेतला. अधिवेशनाचा कालावधी सुरळीत आणि शिस्तबद्ध असावा, यासाठी सभापतींनी प्रशासनाला कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. (Ram Shinde)

​या बैठकीत प्रामुख्याने सुरक्षिततेच्या मुद्द्यावर भर देण्यात आला. पावसाळी वातावरणाचा विचार करता विधानभवनातील मंडप सुरक्षित ठेवण्यासोबतच, परिसरातील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता ‘डिजिटल प्रवेशपास’ प्रणालीचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. यामुळे विनाकारण होणारी गर्दी टाळून विधानभवनातील कामकाजात शिस्त राखली जाणार आहे. (Ram Shinde)

(हेही वाचा – अमेरिका स्थलांतरितांसाठी असुरक्षित, प्रशासनाचे कडक धोरण; AAPI समुदायात भीतीचे वातावरण)

​सुरक्षा आणि स्वच्छतेसोबतच, अधिवेशनासाठी येणारे लोकप्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनुभवी डॉक्टरांची टीम आणि अद्ययावत वैद्यकीय सुविधा तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, उपहारगृहातील अन्नाचा दर्जा आणि स्वच्छता राखण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाला विशेष सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Ram Shinde)

​या बैठकीला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, विधानमंडळ सचिवालयाचे वरिष्ठ सचिव जितेंद्र भोळे, मेघना तळेकर इटकेलवार, डॉ. विलास आठवले, शिवदर्शन साठ्ये यांच्यासह पोलीस आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पोलीस विभागाने बंदोबस्तासाठी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यासाठी विशेष खबरदारी घ्यावी, असेही सभापतींनी यावेळी स्पष्ट केले. एकंदरीत, पावसाळी अधिवेशनाचे नियोजन करताना प्रशासनाने कोणत्याही प्रकारची ढिलाई न ठेवता प्रत्येक सोयीसुविधा तत्पर ठेवण्यावर भर दिला आहे. (Ram Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.