Sanjay Deshmukh : ‘मातोश्री’ला बगल देत संजय देशमुखांची थेट दिल्लीवारी; देशमुखांच्या दौऱ्यामागील गुपित काय?

237
Sanjay Deshmukh : 'मातोश्री'ला बगल देत संजय देशमुखांची थेट दिल्लीवारी; देशमुखांच्या दौऱ्यामागील गुपित काय?
Sanjay Deshmukh : 'मातोश्री'ला बगल देत संजय देशमुखांची थेट दिल्लीवारी; देशमुखांच्या दौऱ्यामागील गुपित काय?
  • ​विशेष प्रतिनिधी

​शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख (Sanjay Deshmukh) यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांची अचानक भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काल मुंबईत मातोश्रीवर झालेल्या शिवसेनेच्या (Shiv Sena) अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला खासदार देशमुख अनुपस्थित होते. बैठकीला दांडी मारल्यानंतर थेट दुसऱ्याच दिवशी सत्ताधारी महायुतीतील मंत्र्यांसोबतची त्यांची भेट राजकीय तर्कांना वाव देणारी ठरली.

(हेही वाचा – Ind vs Afg, ODI Match : अफगाणिस्तानविरुद्ध धावचित झाल्यावर चिडलेला रोहित शर्मा शुभमनला काय म्हणाला?)

​संजय देशमुख यांच्या या दिल्ली भेटीने ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम लावण्यासाठी खासदार देशमुख यांनी स्वतःहून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना फोन केला. आपल्या मतदारसंघातील एका महाविद्यालयाच्या मंजुरीचे महत्त्वाचे काम प्रलंबित होते. याच शैक्षणिक कामाच्या तातडीच्या मंजुरीसाठी आपण केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. ही भेट केवळ मतदारसंघाच्या विकासासाठी असून यात कोणताही राजकीय हेतू नाही, असा खुलासा करत त्यांनी आपण पक्षाशी पूर्णपणे बांधील असल्याचे उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीला अनुपस्थित राहण्यामागे कौटुंबिक कारण असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते आणि आता दिल्लीतील भेटीचा खुलासा करून त्यांनी सर्व संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.