Solapur accident : सोलापूर विहीर दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अपघातातील मृतांना वाहिली श्रद्धांजली

121
Crowd gathered at the site of the Solapur accident.
A tragic accident occurred in Solapur, resulting in multiple fatalities.

Solapur accident : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात रविवारी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेली पिकअप व्हॅन अचानक विहिरीत कोसळल्याने, 8 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, या भीषण दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra fadnvis) यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मदतीची घोषणा केली.

सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी येथे, एक वाहन खासगी शेतातील विहिरीत कोसळून जी दुर्घटना घडली ती अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी आहे” असे म्हणत, मुख्यमंत्र्यांनी अपघातात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली, तसेच राज्य सरकार त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली.

काय म्हणाले मुख्यमंत्री: 

“सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी येथे एक वाहन खाजगी शेतातील विहिरीत पडल्याने झालेल्या अपघातात काही भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. सुदैवाने 7 जणांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक दोघेही तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत आणि स्थानिक प्रशासनाशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत. या घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारकडून देण्यात येईल.”

हेही वाचा: FSSAI चा नवा आदेश! खाद्यपदार्थांच्या पॅकिंगमध्ये स्टेपल पिन, मेटल वायर वापरायला बंदी, नियम मोडल्यास…

दरम्यान, या घटनेनंतर संबंधित विहिरीच्या बांधकामासाठी परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांसह जबाबदार व्यक्तींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

कसा घडला अपघात?

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात रविवारी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेली पिकअप व्हॅन अचानक विहिरीत कोसळल्याने, 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, अपघातग्रस्त व्हॅनमधून एकूण 14 जण प्रवास करत होते, त्यापैकी 7 जणांना वाचवण्यात यश आले असून, 8 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अचानक झालेल्या या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने बचावकार्य हाती घेतले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पिकअप वाहनातून प्रवास करणारे सर्व नागरिक पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवाशी होते. दरम्यान, देवदर्शनाहून परतत असताना हा अपघात घडला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज नोंदवला जात आहे. वेगाने आलेले वाहन थेट विहरीत कोसळले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली.

हेही वाचा: Beed : बाईपण भारी देवा! चार सख्ख्या बहिणींनी जिद्दीच्या जोरावर केली मोठी कामगिरी…

घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलीसांसह आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. विहिरीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले. स्थानिक ग्रामस्थांनीही बचावकार्यात सक्रिय सहभाग घेतला. ताज्या माहितीनुसार, अपघातग्रस्त वाहनातून 6 जणांना वाचवण्यात यश आले असून, अन्य नागरिकांचा दुर्देवी मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, प्रशासनाकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.