पुण्यात रंगणार 100th Marathi Sahitya Sammelan; वाचा संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर 

136
Logo of the 100th Marathi Sahitya Sammelan
The logo for the 100th Marathi Sahitya Sammelan.

इतिहासातील अत्यंत मानाचे आणि ऐतिहासिक शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Marathi Sahitya Sammelan) विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात आयोजित केले जाणार आहे. हे शतकमहोत्सवी संमेलन २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) भव्य प्रांगणात पार पडेल. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने घेण्यात आला असून, महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण (Yogesh Soman ) यांनी पत्रकार परिषदेत याविषयीची अधिकृत माहिती दिली आहे. (100th Marathi Sahitya Sammelan)

(हेही वाचा – सूर्य चौहानच्या हत्येनंतर प्रशासनाची कारवाई सुरूच; ट्रोनिका सिटीमधील अनधिकृत Mazar केला जमीनदोस्त)

संमेलनाचे संयोजक, समर्थ युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, मसापाच्या प्रमुख कार्यवाड डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर उपस्थित होते. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संमेलनाचे स्थळ आणि तारखा याबाबत सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. यापूर्वी दिनांक १३ जूनला स्थळ निवड समितीने एस. पी. महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठ परिसराची पाहणी केली होती. या पाहणीमध्ये योगेश सोमण, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ आणि लखनसिंह कटरे सहभागी झाले होते. (100th Marathi Sahitya Sammelan)

बैठकीत विविध पैलूंवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संमेलनासाठी आवश्यक असलेले भव्य प्रांगण, प्रशस्त पार्किंग व्यवस्था तसेच विद्यापीठातील सुमारे दीड हजार प्राध्यापक व कर्मचारी संमेलनाच्या यशासाठी सहकार्य करतील, अशी ग्वाही कुलगुरू सुरेश गोसावी यांनी दिल्याचे अध्यक्षांनी सांगितले. या सर्व बाबींचा विचार करून शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. रविवारी झालेल्या बैठकीस ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह महामंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते.

(हेही वाचा – पक्षीप्रेमींसाठी आनंदाची बातमी! रत्नागिरीच्या किनाऱ्यांवर ‘Brown Booby’ दुर्मिळ समुद्री पक्ष्याचे दर्शन )

नांदी शंभराव्या साहित्य संमेलानाची या उपक्रमातून पुणे, मुंबई वगळता जेथे साहित्य संमेलने झाली आहेत, अशा महाराष्ट्रातील ४८ ठिकाणांसह महाराष्ट्राच्या विविध भागात संमेलनपूर्व ९९ साहित्यिक उपक्रमांद्वारे शंभराव्या साहित्य संमेलनाची नांदी होणार आहे. १५ ऑगस्ट ते १५ जानेवारी या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम राबविले जाणार आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.