
-
कल्याण : प्रतिनिधी
Dombivli : पाच वर्षांपासून रोजची कोंडी आणि हजारो नोकरदारांकडून होणारा संतापाचा कडेलोट आता संपुष्टात येणार आहे. दिवा-वसई मार्गावरील (Diva-Vasai Road) मोठागाव रेतीबंदर रेल्वे फाटक आता इतिहास जमा होणार आहे. रेल्वेने चार पदरी उड्डाणपुलाला मंजुरी दिल्यानंतर केडीएमसीने (KDMC) पोहोच रस्त्यांसाठी दुसऱ्यांदा निविदा काढली आहे. पहिली निविदा रद्द झाल्याने प्रशासनाने नव्याने ई-निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. (Dombivli)

मोठागाव-माणकोली पुलावर जाण्यासाठी रेतीबंदर फाटक हा सगळ्यात मोठा अडथळा होता. सकाळ-संध्याकाळ इथे अर्धा-अर्धा तास गाड्या फाटक बंदमुळे अडकायच्या. डोंबिवली ते ठाणे-मुंबई धावणाऱ्या नोकरदार वर्गाची यामुळे रोज तारांबळ उडायची. यासाठी डोंबिवलीचे आमदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि स्थानिक नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी पाच वर्षे पाठपुरावा केला. सुरूवातीला रेल्वे दोन पदरी पूल करायला तयार होती. तथापी भविष्यातील वाहतूक लक्षात घेऊन चार पदरीच करा, असे आमदार रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि स्थानिक नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे अखेर रेल्वेने होकार दिला. (Dombivli)
(हेही वाचा – Crime : कल्याण-डोंबिवलीतील ज्येष्ठ महिला चोरांच्या टार्गेटवर; २४ तासांत चेन स्नॅचिंगच्या दोन घटना)
शासनाने दोन वर्षांपूर्वीच १६१ कोटी रुपये मंजूर केले आहेत. पूल आणि पोहोच रस्त्यांसाठी ८९ कोटी ६५ लाखांचा निधी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केडीएमसीकडे वर्ग केला आहे. रेल्वे पूलासाठी सुमारे १५ कोटी खर्च केला जाणार आहे. पोहोच रस्ते केडीएमसी करणार आहे. त्यासाठी ३५ लाख ४ हजार अनामत रक्कम असून हे काम पूर्ण करण्याचा कालावधी २४ महिन्यांचा राहणार आहे. केडीएमसीच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांनी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. ठेकेदार १५ जून ते १० जुलै दुपारी ३ पर्यंत ई-निविदा भरू शकतील. १ जुलै दुपारी ४ वाजता निविदा उघडल्या जातील. २३ जून दुपारी ३ वाजता निविदा पूर्व बैठक आहे. (Dombivli)
रेल्वे फाटक होणार इतिहासजमा
उल्हास खाडीवरील मोठगाव-माणकोली उड्डाण पुलावर जाण्यासाठी कोपर (Kopar) ९० फुटी रस्ता गेल्या वर्षी सुरू झाला. त्यामुळे भार काहीसा कमी झाला. पण शहराच्या मध्यातून ठाणे-मुंबईला जायचा मधला मार्ग म्हणजे मोठगाव-माणकोली पूलच डोंबिवलीकरांसाठी वरदान ठरला आहे. त्यामुळे रेतीबंदर फाटक हटले की डोंबिवलीकरांना खरा दिलासा मिळेल. भाजपा-शिवसेनेने आयुक्त अभिनव गोयल (Abhinav Goyal) यांच्याकडे पोहोच रस्त्यांचे काम तातडीने सुरू करा, अशी मागणी केली होती. आता निविदा निघाल्यानंतर काम सुरू होणार आहे. फाटक बंद…गाडी बंद…अशा त्रासातून डोंबिवलीकरांची मुक्तता होण्याची चिन्हे आहेत. (Dombivli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
