- कल्याण : प्रतिनिधी
कल्याण-डोंबिवलीत (Kalyan-Dombivli) दोन दिवसांत दोन ज्येष्ठ महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन हिसकावून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. दोन्ही ठिकाणी ज्येष्ठ महिलांना एकटे लक्ष्य करून चेन स्नॅचिंग झाले आहे. पोलिस तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. महिलांनी गर्दीच्या ठिकाणी आणि एकटे जाताना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. (Crime)
(हेही वाचा – America Plane Crashed: वॉशिंग्टनमध्ये अमेरिकन लष्करी लढाऊ विमान कोसळले, वैमानिक जखमी)
पहिली घटना शनिवारी रात्री ९.४० वाजण्याच्या सुमारास कल्याण पूर्वेतील मलंगगड रोडला असलेल्या जय मल्हार हॉटेलच्या मागे श्रीकृपा होम्स बिल्डिंगमध्ये घडली. ६५ वर्षीय कुमारी विश्वंभर या घराकडे पायऱ्या चढून जात असताना २५ ते ३० वयोगटातील अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील १ लाख ५० हजार रूपये किंमतीची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुमारी विश्वंभर या भयभीत झाल्या होत्या. त्यांनी घरच्यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी घरच्यांसह कोळसेवाडी पोलिस ठाण्यात जाऊन तशी तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप भालेराव (Sandeep Bhalerao) आणि त्यांचे सहकारी अधिक तपास करत आहेत. (Crime)
दुसरी घटना शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेतील रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या नाका नंबर १ रिक्षा स्टँडवर घडली. ७७ वर्षीय इंदुमती मधुकर किनकर या रिक्षातून प्रवास करत होत्या. या रिक्षातून प्रवास करणाऱ्या ४० ते ४५ वयोगटातील अनोळखी महिलेने बाळाला खांद्यावर घेण्याचा बहाणा करून इंदुमती यांचे लक्ष विचलित केले आणि त्यांच्या गळ्यातील ५० हजार रूपये किंमतीची सोन्याची चेन अलगद काढून पोबारा केला. इंदुमती यांच्या नंतर हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी रामनगर पोलिस ठाण्यात जाऊन तशी तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी फरार महिलेच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण बोरा अधिक तपास करत आहेत. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

