America Plane Crashed: वॉशिंग्टनमध्ये अमेरिकन लष्करी लढाऊ विमान कोसळले, वैमानिक जखमी

62
America Plane Crashed: वॉशिंग्टनमध्ये अमेरिकन लष्करी लढाऊ विमान कोसळले, वैमानिक जखमी
America Plane Crashed: वॉशिंग्टनमध्ये अमेरिकन लष्करी लढाऊ विमान कोसळले, वैमानिक जखमी

America Plane Crashed: अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील जंगल परिसरात लष्करी लढाऊ विमान कोसळले. विमान कोसळल्यानंतर जंगलात वणवा लागला. वैमानिकाने प्रसंगावधान राखत वेळीच उडी घेतल्याने तो बचावला असून किरकोळ जखमी झाला आहे. त्याला तपासणीसाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रियरॉक लेकजवळ ही दुर्घटना घडली. जंगलात लागलेली आग विझवण्याचे काम सुरू झाले.

लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कॅलिफोर्नियातील मरीन कॉर्प्स एअर स्टेशन मिरामार येथे तैनात असलेले एफ/ए-१८ हॉर्नेट विमान नियमित प्रशिक्षण येत असताना कोसळले. हे लढाऊ विमान कॅलिफोर्नियातील मरीन कॉर्प्स एअर स्टेशन मिरामार येथील मरीन एअरक्राफ्ट ग्रुप ११, तिसऱ्या मरीन एअरक्राफ्ट विंगला नेमून देण्यात आले होते. या विमान अपघाताच्या कारणांचा तपास यूएस मरीन कॉर्प्सकडून सुरू आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.