Eastern Express Highway Accident : पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; दुचाकी घसरून १७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, मित्र जखमी

14
Eastern Express Highway Accident
Eastern Express Highway Accident

Eastern Express Highway Accident : विक्रोळी येथील पूर्व द्रुतगती महामार्गावर गुरुवारी सकाळी भरधाव दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याचा मित्र किरकोळ जखमी झाला. दोशी जैनम जयेशभाई असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपरहून विक्रोळीच्या दिशेने जाणाऱ्या सेवा रस्त्यावरून दोशी जैनम आणि त्याचा मित्र धैर्य अनिल भानुशाली हे दोघे सुझुकी जिक्सर दुचाकीवरून (क्रमांक एमएच-०४/एचव्ही-३८९५) निघाले होते. सकाळी सव्वासातच्या सुमारास गोदरेज सिग्नलजवळ अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट रस्त्यावर घसरली. हा अपघात इतका भीषण होता की दोघेही रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले.

(हेही वाचा – शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू; DCM Eknath Shinde यांनी दिली माहिती )

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांनाही तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच जैनमचा मृत्यू झाल्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रवी राठोड यांनी घोषित केले.

या अपघातात धैर्य भानुशाली हा किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी १७ वर्षाचा मयत याच्यासह गाडी मालकावर गुन्हा दाखल केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.