
-
कल्याण : प्रतिनिधी
नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होताच कल्याण लोकसभा मतदारसंघातील हजारो विद्यार्थ्यांच्या हात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांच्या माध्यमातून दहा लाख वह्या पोहोचणार आहेत. शिक्षणाला बळ देणारा आणि पालकांचा आर्थिक भार हलका करणारा हा लोकहिताचा उपक्रम राबवला जाणार आहे.
कोणत्याही विद्यार्थ्याला वह्यांअभावी शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, या भावनेतून हा उपक्रम साकारला आहे. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरसह ग्रामीण भागातील शाळांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने वह्यांचे वितरण केले जाणार आहे. विशेषतः गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना (Students) याचा मोठा आधार मिळणार आहे. शिक्षण हा सामाजिक परिवर्तनाचा पाया आहे, हे मानून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) दरवर्षी विविध शैक्षणिक उपक्रम राबवतात. यंदा तर दहा लाख वह्यांच्या वाटपामुळे पालकांवरील खर्चाचा ताण कमी होणार आहे. नवीन वह्या, नवीन वर्ष, नवीन उत्साह घेऊन विद्यार्थी वर्गात प्रवेश करणार आहेत.
(हेही वाचा – Dombivli MIDC अराजकांच्या उंबरठ्यावर; दारूड्यांच्या कहराने नोकरदार महिला धास्तावल्या)
फक्त वह्या नाही तर आत्मविश्वासही
वह्यांचे वितरण हा केवळ साहित्य देण्याचा कार्यक्रम नाही, तर गरजू विद्यार्थ्याला लागणारी शैक्षणिक साधने वेळेत मिळाली तर त्याच्यात आत्मविश्वास वाढतो, तो निर्धास्तपणे शिकतो, असे मत शिक्षक व्यक्त करतात. डॉ. श्रीकांत शिंदे सातत्याने शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रयत्नशील आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक कोपऱ्यातील विद्यार्थ्यापर्यंत या उपक्रमाचा लाभ पोहोचावा यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. दहा लाख वह्या म्हणजे दहा लाख स्वप्नांना मिळणारे पंखच असल्याच्या भावना अनेक पालकांनी व्यक्त केल्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
