बेरोजगार पशुवैद्यकांसाठी सुवर्णसंधी! मंत्री Pankaja Munde यांच्या पाठपुराव्याला यश

३००० पेक्षा जास्त पदांसाठी मेगाभरतीचा मुहूर्त ठरला

137
बेरोजगार पशुवैद्यकांसाठी सुवर्णसंधी! मंत्री Pankaja Munde यांच्या पाठपुराव्याला यश
  • प्रतिनिधी

​Pankaja Munde               राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील पदवीधरांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या पदांच्या भरतीची प्रतीक्षा आता संपली असून, पशुसंवर्धन विभागाच्या इतिहासातील ही एक सर्वात मोठी भरती प्रक्रिया मानली जात आहे. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) तब्बल ३ हजार १०३ पदांच्या भरतीसाठी हिरवा कंदील दाखवला आहे. (Pankaja Munde)

(हेही वाचा – Skyroot Aerospace : भारताची पहिली स्पेस-टेक कंपनी स्कायरूट कशी उभी राहिली?)

​महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, पशुधन विकास अधिकारी (गट-अ) या पदासाठी २ हजार ७९५ आणि सहाय्यक आयुक्त (गट-अ) या पदासाठी ३०८ अशा एकूण ३ हजार १०३ जागा भरल्या जाणार आहेत. या मेगाभरतीसाठी ११ जून २०२६ रोजी मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या केंद्रांवर संगणक आधारित चाळणी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेची वेळ संध्याकाळी ५:३० ते ७ अशी निश्चित करण्यात आली असून, या परीक्षेतील गुणांच्या आधारेच गुणवत्ता यादी जाहीर करून पुढील निवड प्रक्रिया राबवली जाईल. (Pankaja Munde)

(हेही वाचा – वादळी वाऱ्यात हेलकावलं DCM Eknath Shinde यांचं हेलिकॉप्टर; जुहूत थरारक ‘इमर्जन्सी लँडिंग’)

​ग्रामीण भागात पशुवैद्यकीय सेवा देताना रिक्त पदांमुळे यंत्रणेवर मोठा ताण येत होता. लसीकरण, आरोग्य तपासणी आणि शेतकऱ्यांना मिळणारी मदत यामुळे रखडली होती. मात्र, आता एकाच वेळी इतके अधिकारी विभागात रुजू होणार असल्याने पशुधनाची काळजी घेणारी यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करत म्हटले की, “ज्या बातमीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण अखेर आला आहे. या भरतीमुळे विभागाच्या कामाला वेग येईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेले पशुधन सुरक्षित राहील.” त्यांनी या परीक्षेला बसणाऱ्या सर्व उमेदवारांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. (Pankaja Munde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.