IPL 2026 : जाणून घ्या या हंगामातील पंजाब किंग्ज संघाचं संपूर्ण वेळापत्रक

पंजाबचा पहिला सामना मंगळवारी गुजरातविरुद्‌ध खेळणार आहे.

145
IPL 2026 : जाणून घ्या या हंगामातील पंजाब किंग्ज संघाचं संपूर्ण वेळापत्रक 
IPL 2026 : जाणून घ्या या हंगामातील पंजाब किंग्ज संघाचं संपूर्ण वेळापत्रक 
  • ऋजुता लुकतुके

IPL 2026 : पंजाब किंग्ज (Punjab Kings) संघाने आपल्या नव्या कर्णधार श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वाखाली गेल्या हंगामात दमदार कामगिरी केली. त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. पण, अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध (RCB) त्यांना हार पत्करावी लागली. यावेळी संघाला पहिल्या वहिल्या विजेतेपदाची आशा आहे. (IPL 2026)

संघाचा माजी खेळाडू इरफान पठाणने (Irfan Pathan) आताच्या संघाचं विश्लेषण करताना, नेतृत्वातील स्पष्टता आणि संघ बांधणीतील सुधारणा यांना शंभर टक्के गुण दिले आहेत. पठाण म्हणाला की, “श्रेयस अय्यरने पंजाबच्या बदलात मोठी भूमिका बजावली आहे. तुम्ही आयपीएलचा अर्धा भाग लिलावाच्या वेळी जिंकता. आणि तिथेच काही धाडसी निर्णय घेऊन पंजाबने बाजी मारली.” (IPL 2026)

ग्लेन मॅक्सवेलला (Glenn Maxwell) सोडणं आणि ताज्या दमाची फळी तयार करणं, हे यशाचं गुपित असल्याचं पठाणला वाटतं.

(हेही वाचा – CM Adityanath Yogi यांना खेळण्यातील बुलडोझर भेट देणाऱ्या ५ वर्षांच्या चिमुकलीने जिहादी मुसलमानांना केले अस्वस्थ)

दिनांक

सामना

ठिकाण

वेळ 

३१ मार्च

वि. गुजरात टायटन्स

न्यू चंदीगड

संध्या ७:३०

३ एप्रिल

वि. चेन्नई सुपर किंग्स

चेन्नई

संध्या ७:३०

६ एप्रिल

वि. कोलकाता नाईट रायडर्स

कोलकाता

संध्या ७:३०

११ एप्रिल

वि. सनरायझर्स हैदराबाद

न्यू चंदीगड

संध्या ३:३०

१६ एप्रिल

वि. मुंबई इंडियन्स

मुंबई

संध्या ७:३०

१९ एप्रिल

वि. लखनौ सुपर जायंट्स

न्यू चंदीगड

संध्या ७:३०

२५ एप्रिल

वि. दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली

संध्या ३:३०

२८ एप्रिल

वि. राजस्थान रॉयल्स

न्यू चंदीगड

संध्या ७:३०

३ मे

वि. गुजरात टायटन्स

अहमदाबाद

संध्या ७:३०

६ मे

वि. सनरायझर्स हैदराबाद

हैदराबाद

संध्या ७:३०

११ मे

वि. दिल्ली कॅपिटल्स

धर्मशाळा

संध्या ७:३०

१४ मे

वि. मुंबई इंडियन्स

धर्मशाळा

संध्या ७:३०

१७ मे

वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू

धरमशाला

संध्या ३:३०

२३ मे

वि. लखनौ सुपर जायंट्स

लखनौ

संध्या ७:३०

 

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.