KDMC : कल्याण-डोंबिवलीतून १७५८० किलो ओल्यासह ४६९९६ किलो सुक्या कचऱ्याचे उच्चाटन

167
KDMC : कल्याण-डोंबिवलीतून १७५८० किलो ओल्यासह ४६९९६ किलो सुक्या कचऱ्याचे उच्चाटन
KDMC : कल्याण-डोंबिवलीतून १७५८० किलो ओल्यासह ४६९९६ किलो सुक्या कचऱ्याचे उच्चाटन
  • कल्याण : प्रतिनिधी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) आणि महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी विशेष स्वच्छता मोहिमेचे (​Cleanliness campaign) आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत डोंबिवलीमध्ये (Dombivli) आमदार राजेश मोरे, तर कल्याणमध्ये आमदार सुलभा गायकवाड (Sulbha Gaikwad) यांच्यासह अनेक नवनिर्वाचित नगरसेवकांनी हातात झाडू घेऊन सक्रिय सहभाग घेतल्याचे दिसून आले. या मोहिमेच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवलीतून १७ हजार ५८० किलो ओल्यासह ४६ हजार ९९६ किलो सुक्या कचऱ्याचे निर्मूलन करण्यात आले.

1004304014 scaled

कल्याण पश्चिमेत महापौर ॲड. हर्षाली चौधरी, आयुक्त अभिनव गोयल, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे, शिवसेनेचे शहरप्रमुख रवी पाटील यांच्यासह नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. तर डोंबिवली पूर्वेत केडीएमसीच्या (KDMC) विभागीय कार्यालय परिसरात उपमहापौर राहूल दामले यांच्यासह नगरसेवकांनी स्वच्छता मोहीम राबविली. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्यासह १०० पोलिसांनी देखिल या मोहिमेत सहभाग घेतला होता. महापालिकेच्या प्रत्येक प्रभागांमध्येही केडीएमसीच्या स्वच्छता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्री सदस्य, नगरसेवकांनी स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला होता.

(हेही वाचा – Ind vs Wi T20 world cup: ईडन गार्डन्सवर रंगणार ‘आर या पार’ची लढाई! खेळपट्टी काय सांगते?)

या मोहिमेदरम्यान कल्याण-डोंबिवलीतील प्रमुख रस्त्यावरील कचरा, धुळ, माती साफ करून घंटागाडीसह डंपरमार्फत संकलित करण्यात आली. तब्बल १७ हजार ५८० किलो ओला आणि ४६ हजार ९९६ किलो सुका कचरा या मोहिमेत संकलित करण्यात आला. स्वच्छता मोहिमेकरिता महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे जवळपास ४ हजार श्री सदस्य, तर महापालिकेचे जवळपास १ हजार कर्मचाऱ्यांसह नवनिर्वाचित नगरसेवक सहभागी झाले होते.

1004304016

कल्याण-डोंबिवलीकरांचे योगदान आवश्यक

आपले शहर, आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आपले घर आणि परिसर स्वच्छ आणि नीटनेटका राखण्यासाठी कल्याण-डोंबिवलीकरांनी देखिल स्वच्छता मोहिमेत आपले योगदान द्यावे. घरातून निघणारा दैनंदिन कचरा विलगीकरण अर्थात ओला/सुका वेगळा करून द्यावा, असे आवाहन महापौर ॲड. हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल (Abhinav Goyal) यांनी यावेळी बोलताना केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.