Israel Iran War : आता पाकड्यांच्या मुल्ला असीम मुनीरची झाली गोची; कारण…

अमेरिका- इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर (Israel Iran War) आणि सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या मृत्युनंतर, मध्य पूर्व एका मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर आहे.

205
Israel Iran War featuring leaders and smoke cloud
A significant conflict involving Israel and Iran unfolds.

सध्या इस्राईल आणि इराणच्या (Israel Iran War) विरुद्ध तुंबळ युद्ध सुरू आहे, त्यात इस्राईलला अमेरिकेचा संपूर्ण पाठिंबा आहे. अशातच पाकिस्तानने आधीच अमेरिकेचे तळवे चाटायला सुरुवात केल्याने या युद्धात अमेरिकेच्या मागणीमुळे पाकड्यांना या युद्धात अमेरिकेला साहाय्य करावे लागत आहे. इस्राईलने पॅलेस्टिनींची हत्या केल्याने पाकिस्तानच्या मुसलमानांमध्ये प्रचंड असंतोष असताना आता पाकड्यांच्या लष्करप्रमुख मुल्ला असीम मुनीरची या युद्धात अमेरिकेला मदत करायची म्हणजे इस्राईलला मदत होणार आहे, अशा कात्रीत सापडला असताना आधीच अफगाणिस्तानातील तालिबान्यांनी सीमेवर पाकड्यांना सळो कि पळो करून सोडले आहे, अशा वेळी त्यांचा बंदोबस्त कसा करायचा, या सगळ्या परिस्थितीमुळे मुनीरची चांगलीच गोची झाली आहे. (Israel Iran War)

अमेरिका- इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर (Israel Iran War) आणि सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या मृत्युनंतर, मध्य पूर्व एका मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर आहे. इराणने इस्रायल आणि सौदी अरेबियासह अनेक मध्य-पूर्वेतील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य करून क्षेपणास्त्रे डागली आहेत. इराणने अमेरिकेचे तळ असलेल्या जवळजवळ प्रत्येक आखाती देशावर क्षेपणास्त्रे डागली आहेत. पाकिस्तान सौदी अरेबियाच्या मदतीला येईल का, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. (Israel Iran War)

(हेही वाचा US Israel airstrikes Iran: “तुम्ही एका हुसैनीला माराल, तर प्रत्येक घरातून…”; खामेनेईंच्या मृत्यूने UP मध्ये घोषणाबाजी)

असीम मुनीरचे सैन्य इराणवर हल्ला करेल का? 

गेल्या वर्षी पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये झालेल्या करारामुळे इराणी हल्ल्यानंतर हा प्रश्न जागतिक स्तरावर उपस्थित केला जात आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सौदी अरेबिया आणि अण्वस्त्रधारी पाकिस्तानने सामरिक परस्पर संरक्षण करारावर स्वाक्षरी केली. कोणत्याही देशाचे नाव न घेता, करारात म्हटले होते की, कोणत्याही देशाविरुद्धचा कोणताही हल्ला हा दोघांविरुद्धचा हल्ला मानला जाईल. (Israel Iran War) पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये अनेक दशकांपासून अनौपचारिक संरक्षण संबंध आहेत, परंतु हा नवीन करार इस्लामिक देशांमधील सुरक्षा सहकार्याला औपचारिक करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात होते. दरम्यान, आता पाकिस्तान सौदी अरेबियाला मदत करण्यासाठी पुढे येईल का? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, पाकिस्तान स्वतः शेजारील अफगाणिस्तानसोबत युद्धाच्या उंबरठ्यावर आहे. अलिकडेच, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर अनेक हल्ले केले आहेत. सौदी अरेबियाचे दोन प्रमुख शत्रू इराण आणि इस्रायल आहेत. सौदी अरेबिया आपल्या सुरक्षेसाठी अमेरिकेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. ग्लोबल फायरपॉवर डेटाबेसनुसार, १४५ देशांपैकी सौदी अरेबिया २४ व्या क्रमांकावर आहे, तर त्याचा मित्र पाकिस्तान १२व्या क्रमांकावर आहे. दरम्यान, अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारत जगातील चौथ्या क्रमांकाची लष्करी शक्ती आहे. (Israel Iran War)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.