Beed : बीडकरांच्या वर्षानुवर्षांच्या प्रतिक्षेचा अंत; मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी नेमकं काय घडलं?

9
Beed
Beed
  • प्रतिनिधी

Beed : बीड शहराच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक वैभवात भर घालणाऱ्या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची पायाभरणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून अत्यंत उत्साहात पार पडली. स्थानिक कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ऐतिहासिक यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी ८ कोटी १९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, जुनी वास्तू कायम ठेवत येथे अत्याधुनिक ध्वनी-प्रकाश व्यवस्था, साउंड अकोस्टिक, सेंट्रल एसी आणि अद्ययावत ग्रीन रूम्स उभारल्या जाणार आहेत. याचबरोबर, धानोरा रस्त्यावरील ‘पंढरी’ येथे सुमारे २८ कोटी रुपये खर्चाचे भव्य तारांगण व विज्ञान उद्यान आकारास येत आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी १४ कोटी रुपये मंजूर झाले असून, येथे विद्यार्थ्यांना मातृभाषेतून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), आभासी तंत्रज्ञान आणि खगोलशास्त्राचे प्रत्यक्ष ज्ञान घेता येणार आहे. या सोहळ्यात निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्या शाळकरी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

(हेही वाचा – Semicon India 2026 : ‘चिप’ निर्मितीच्या जगात भारताची दमदार एन्ट्री; काय आहे भारताचा मास्टरप्लॅन  )

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार विजयसिंह पंडित यांच्यासह प्रशासकीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना विनम्र आदरांजली वाहण्यात आली, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. दिवंगत नेते अजितदादा पवार यांनी जिल्ह्याच्या दळणवळणासाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण होत असल्याचा उल्लेख करत, लवकरच बीड-पनवेल थेट सेवा आणि बीड-परळी मार्ग पूर्ण करून हा परिसर थेट दक्षिण भारताशी जोडला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, या सर्व उपक्रमांच्या केंद्रस्थानी बीडकरांसाठी सर्वात मोठी आणि ऐतिहासिक आनंदाची बातमी ठरली. अनेक दशकांपासून रेल्वे नकाशावर उपेक्षित राहिलेल्या बीडकरांची थेट पुण्यासाठीची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली. ‘रेल संख्या झिरो वन फोर झिरो वन प्रस्थान के लिए तयार है’ या उद्घोषणेच्या आणि प्रचंड जल्लोषाच्या वातावरणात, राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी ‘बीड-पुणे’ थेट रेल्वेसेवेला हिरवा झेंडा दाखवून या बहुप्रतिक्षित सेवेचा दिमाखदार शुभारंभ केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.