
Pune Beed Train: पुणे आणि बीडदरम्यान बहुप्रतीक्षित थेट रेल्वेसेवा सुरू होत आहे. गुरुवारी (ता. १७) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीड स्थानकावर नवीन सेवेचे उद्घाटन होणार आहे. रेल्वे बोर्डाने बुधवारी रेल्वेचे वेळापत्रक जाहीर केले असून, यात पुण्याहून बीडला जाण्यासाठी सात तासांचा वेळ लागणार आहे.
रेल्वेसेवा दैनंदिन असल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. या रेल्वेला १६ डबे असणार असून, यातून सुमारे दोन हजार प्रवाशांची एकाच वेळी वाहतूक होणार आहे. त्यामुळे बीडहून पुण्यात येणारे नोकरदार, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांसाठी मोठी सोय होणार आहे.
बीड स्थानकावर गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून सेवेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी पुणे रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. रेल्वे बोर्डाने अद्याप नियमित सेवेची तारीख जाहीर केली नाही. मात्र, लवकरच पुणे-बीड रेल्वेची सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
असे आहे वेळापत्रक
पुणे ते बीड (गाडी क्र. ११४३३) : गाडी पुण्याहून रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी सुटेल आणि सकाळी सहा वाजता बीडला पोचेल.
बीड ते पुणे (गाडी क्र. ११४३४) : गाडी बीडहून रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी सुटेल आणि पुण्याला पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी पोचेल.
या स्थानकांवर थांबा
उरुळी, दौंड कॉर्ड लाइन, श्रीगोंदा रोड, अहिल्यानगर, नारायणडोहो, नवीन आष्टी, अमळनेर.
हेही पाहा

