-
ऋजुता लुकतुके
भारताचा अव्वल घोडेस्वार अनुष अगरवालाने (Anush Agarwalla) जर्मनीत रंगलेली एक ड्रेसेज स्पर्धा जिंकून इतिहास रचला आहे. घोडेस्वारीत आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय धोडेस्वार आहे. ड्रेसेज प्रकारात पॅरिस ऑलिम्पिकमध्येही त्याने लक्षणीय कामगिरी केली होती. जर्मनीतील ही स्पर्धा सहा स्पर्धकांमध्ये खेळवण्यात आली आणि यातील उर्वरित पाच स्पर्धक जर्मनच होते. अंतिम फेरीत अनुषने ६९.८९१ टक्के गुण मिळवले.
(हेही वाचा – Thane City Ulhasnagar : जामिनावर बाहेर पडलेल्या गुंडांनी पीडितेच्या घरासमोर केली आतिषबाजी)
अनुषची (Anush Agarwalla) ही दुसरीच स्पर्धा होती आणि त्यात त्याने हे यश मिळवलं आहे. ‘जिंकण्याचा अनुभव नेहमी चांगलाच असतो आणि त्यातून पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळते. हा हंगाम चांगल्या बातमीने सुरू झाला आहे,’ असं विजयानंतर अनुष आगरवालाने म्हटलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अनुष आगरवाला खेळला तेव्हापासून तो पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. ड्रेसेज हा घोडेस्वारीतील कठीण प्रकार मानला जातो. पण, अनुषने त्याचीच निवड केली आहे. ड्रेसेजला ‘बॅले ऑन हॉर्स बॅक,’ असं म्हटलं जातं. कारण, यातील हालचाली लयबद्ध असणं महत्त्वाचं आहे.
(हेही वाचा – Bihar Assembly : बिहारच्या विधानसभेत विरोधकांचा तुफान राडा; आरजेडीचे आमदार, मार्शलमध्ये धक्काबुक्की)
१९९९ मध्ये कोलकाता इथं अनुषचा जन्म झाला. तिसऱ्या वर्षीच त्याच्या वडिलांनी त्याला घोडेसवारी शिकवली. पण, १७ व्या वर्षी ऑलिम्पिक पदक विजेते ह्युबरटस श्मिट यांच्याकडे प्रशिक्षण घ्यायला लागल्यापासून अनुषची (Anush Agarwalla) आंतरराष्ट्रीय कामगिरी सुधारली आहे. २०२२ साली भारताकडून आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळणारा तो पहिला भारतीय घोडेस्वार ठरला होता. त्याचवर्षी आशियाई क्रीडास्पर्धेत अनुषने भारताला सांघिक सुवर्ण आणि वैयक्तिक कांस्य जिंकून दिलं होतं. २०२४ मध्ये ड्रेसेज प्रकारासाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याची निवड झाली. भारताचं ऑलिम्पिक प्रतिनिधित्व करणाराही तो पहिलाच घोडेस्वार होता. त्याचवर्षी केंद्रसरकारने त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलं. इथून पुढे अनुषने जागतिक घोडेस्वारी अजिंक्यपद स्पर्दा आणि लॉस एंजलिस ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रीत केलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

