Bihar Assembly : बिहारच्या विधानसभेत विरोधकांचा तुफान राडा; आरजेडीचे आमदार, मार्शलमध्ये धक्काबुक्की

Bihar Assembly :   निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीने आधीच चर्चेत असलेले बिहार आता विधानसभे(Bihar Assembly)तील राड्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

253

Bihar Assembly :   निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीने आधीच चर्चेत असलेले बिहार आता विधानसभे(Bihar Assembly)तील राड्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दरम्यान, बिहार विधानसभे(Bihar Assembly)त तुफान राडा झाल्याची माहिती समोर आली असून आरजेडीचे आमदार, मार्शलमध्ये धक्काबुक्की झाली आहे. मंगळवार, २२ जुलैला बिहार विधानसभेमध्ये चक्क आमदार व सुरक्षेसाठी तैनात असलेल्या मार्शलमध्ये धक्काबुक्की झाली.(Bihar Assembly)

(हेही वाचा ‘आम्हाला भीती वाटेल, हा गैरसमज आहे’; ‘त्या’ कारवाईनंतर CM Himanta Biswa Sarma यांचा स्पष्ट इशारा )

विधानसभे(Bihar Assembly)मध्ये मतदार यादी पुनरीक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान, विरोधी पक्षातील राष्ट्रीय जनता दलाचे आमदार विरोध करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांसमोरील हौद्यात उतरले होते. यादरम्यानच, आरजेडी आमदार व मार्शलमध्ये धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. सभागृहातील कामकाज सुरू होण्याआधीच विधानसभेच्या प्रवेशद्वारांवर अडथळा निर्माण झाला होता.(Bihar Assembly)

या गोंधळानंतर बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना अन्य पर्यायी मार्गाने सभागृहात यावे लागले. तर मुख्यमंत्री नितीश कुमार हे मागच्या द्वाराने सभागृहा(Bihar Assembly)त दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. कामकाज सुरू असताना विधानसभाध्यक्षांनी गदारोळ घालणाऱ्या आमदाराना इशारा दिला होता. परंतु, आमदारांनी विधानसभाध्यक्षांचे ऐकले नाही. त्यानंतर काही आमदारांनी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या मार्शल्ससोबत धक्काबुक्की झाली.(Bihar Assembly)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.