‘आम्हाला भीती वाटेल, हा गैरसमज आहे’; ‘त्या’ कारवाईनंतर CM Himanta Biswa Sarma यांचा स्पष्ट इशारा

CM Himanta Biswa Sarma : मागील चार वर्षांत आसाममध्ये एक लाखाहून अधिक बिघा जमीन अतिक्रमणमुक्त झाल्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा(CM Himanta Biswa Sarma) यांनी सांगितले. आसाममधील घुसखोरांना मुख्यमंत्री सरमा(CM Himanta Biswa Sarma) यांनी स्पष्ट संदेश दिला आहे.

152

CM Himanta Biswa Sarma : मागील चार वर्षांत आसाममध्ये एक लाखाहून अधिक बिघा जमीन अतिक्रमणमुक्त झाल्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा(CM Himanta Biswa Sarma) यांनी सांगितले. आसाममधील घुसखोरांना मुख्यमंत्री सरमा(CM Himanta Biswa Sarma) यांनी स्पष्ट संदेश दिला आहे. ते म्हणाले, आम्हाला भीती वाटेल, हा गैरसमज आहे. जर कुणी असे विचार करत असेल की २-३ मोहिमांनंतर आम्ही घाबरु, तर ते चुकीचे असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.(CM Himanta Biswa Sarma)

दरम्यान, जर कणी असे विचार करत असेल की दोन-तीन मोहिमांनंतर आपण घाबरू, त्यांच्या डोळ्यात डोकावून पाहणार नाही आणि झुकणार नाही, तर ते चुकीचे आहेत. आसाम चळवळीतील हुतात्म्यांचा निश्चितच बदला घेतला जाईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री सरमा(CM Himanta Biswa Sarma) यांनी घुसखोरांना इशारा दिला आहे. विशेष म्हणजे, सुमारे २९ लाख बिघा जमीन ‘बांगलादेशी घुसखोर बंगाली मुस्लिमांनी व्यापलेली आहे.

(हेही वाचा Apache Helicopter In India : शत्रू राष्ट्रांचे धाबे दणाणले ! भारतात पोहोचली अपाचे हेलिकॉप्टरची पहिली तुकडी )

मुख्यमंत्री सरमा यांनी केलेल्या दाव्यानुसार, सुमारे २९ लाख बिघा जमीन ‘बांगलादेशी घुसखोर व बंगाली मुस्लिमांनी व्यापलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, २०२१ मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर ही जमीन रिकामी करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली होती, परंतु ती थांबवण्यासाठी त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय दबाव आणण्यात आला. दरम्यान, सोमवार, २१ जुलैला दरंग जिल्ह्यातील गोरुखुटी येथे गोरुखुटी बहुउद्देशीय कृषी प्रकल्पाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाषण करताना ते बोलत होते.(CM Himanta Biswa Sarma)

 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीएम सरमा म्हणाले, “दारंग जिल्ह्यातील मोहिमेच्या यशानंतर, बोरसोल्ला, लुमडिंग, बुरहापहाड, पाभा, बटादरा, छप्पर आणि पैकन येथेही ही मोहीम राबवण्यात आली. गेल्या ४ वर्षांत आम्ही १.२९ लाख बिघा व्यापलेली जमीन मुक्त केली आहे. आता या जमिनीचा मोठा भाग जंगले निर्माण करण्यासाठी आणि राज्यातील लोकांसाठी वापरला जात आहे. ते पुढे म्हणाले, जर कोणाला असे वाटत असेल की दोन-तीन मोहिमांनंतर आपण घाबरू, त्यांच्या डोळ्यात डोकावून पाहणार नाही आणि नतमस्तक होणार नाही, तर ते चुकीचे आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.(CM Himanta Biswa Sarma)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.