महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी लागू केलेल्या NCMC कार्डच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. सप्टेंबरच्या सुरुवातीपासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी हे कार्ड (Card) बंधनकारक करण्यात आले होते; परंतु नोंदणीदरम्यान उद्भवलेल्या तांत्रिक समस्या आणि गर्दीमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. प्रवाशांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत प्रशासनाने आता प्रक्रियेत सुलभता आणली असून बोटांच्या ठशांशिवाय मोबाइलवर येणाऱ्या ओटीपी क्रमांकाच्या साहाय्याने नोंदणी पूर्ण करण्याचा नवा पर्याय खुला केला आहे. (NCMC Smart Card)
(हेही वाचा – US Russia Sanctions : अमेरिकेच्या रशियावरील निर्बंधांचा भारत अभ्यास करणार; ‘योग्य वेळी चर्चा करू,’ पीयूष गोयल यांचं स्पष्टीकरण)
एसटी प्रवासात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ७५ वर्षांवरील अर्थात अमृत ज्येष्ठ नागरिक अशा सवलतधारक प्रवाशांना ‘एनसीएमसी’ कार्ड नोंदणी आणि वितरण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे एसटीच्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी कार्डमधूनच तिकीट घेण्याची सक्ती करण्याचे नियोजन महामंडळाचे आहे.कार्डसाठी बायोमेट्रिक करताना हातांच्या बोटांचे ठसे जुळवताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. आता बायोमेट्रिक जुळत नसल्यास आधारकार्डशी जोडलेल्या मोबाइल क्रमांकावरील ‘ओटीपी’च्या मदतीने कार्ड नोंदणी पूर्ण करता येईल. यामुळे प्रवाशांना कोणत्याही अडचणीशिवाय कार्ड वितरित करणे शक्य होणार आहे, असे म्हटले जात आहे.
(हेही वाचा – Ajit Agarkar vs VVS Laxman : आगरकर – लक्ष्मण यांच्यातील मतभेदांमुळे आगरकरांची गच्छंती?)
ST बस NCMC कार्ड नोंदणीसाठी आता आधार OTP
राज्य परिवहन एसटी महामंडळाच्या (MSRTC) प्रवाशांना आता आधार OTP वरही NCMC कार्ड घेता येणार आहे. बायोमेट्रिक प्रमाणीकरण करताना येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी महामंडळाने अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार ओटीपीवर कार्डनोंदणी करण्याची मुभा दिली आहे. २१ सप्टेंबरपासून ही सुविधा सुरू करण्यात आली असून, यामुळे बायोमेट्रिकअभावी कार्डनोंदणी रखडलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. आधार ओटीपी आणि कार्डची पुनर्नोंदणी करण्याची सुविधेत १९ सप्टेंबरपर्यंत ‘एनसीएमसी’ कार्डसाठी नोंदणी केलेल्या सर्व प्रवाशांना २५ सप्टेंबरपासून कार्ड वितरित करण्यात येणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

