Shivarajabhishek Sohala : शिवराज्याभिषेक महोत्सव : असाधारण कर्तृत्वाचा जागर

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा पराक्रम, महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राची दुर्दम्य आकांक्षा, महाराष्ट्राच्या शौर्याचे तेजस्वी प्रतिक आहेत.

188
Shivarajabhishek Sohala : शिवराज्याभिषेक महोत्सव : असाधारण कर्तृत्वाचा जागर

हिंदुस्थान पोस्ट ब्युरो

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास २०२४ (Shivarajabhishek Sohala) मध्ये ३५० वर्षे होत आहेत. त्यासाठी राज्य शासन आतापासून तयारी करत आहे. यासाठी राज्याचा सांस्कृतिक विभाग शिवराज्यभिषेक महोत्सव साजरा करत आहे. हा महोत्सव अधिकाधिक चांगल्या प्रकारे साजरा व्हावा यादृष्टीने राज्यातील सर्वच लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि समाजातील मान्यवरांकडून संकल्पना मागवण्यात आल्या आहेत. शिवराज्यभिषेक महोत्सव हा अधिकाधिक चांगल्या प्रकारे साजरा करण्याच्या दृष्टीने शिवप्रेमी आणि नागरिकांनी त्यांच्या संकल्पना [email protected] यावर पाठवण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

(हेही वाचा – Dress code : अहमहनगर (अहिल्यानगर) येथील 16 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार)

शून्यातून विश्व निर्माण करत स्वराज्याची स्थापना

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा पराक्रम, महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राची दुर्दम्य आकांक्षा, महाराष्ट्राच्या शौर्याचे तेजस्वी प्रतिक आहेत. बलाढ्य मोगल सत्तेशी युक्ती आणि बुद्धीने लढत महाराजांनी अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण करत स्वराज्याची स्थापना केली. हा सगळा संघर्षपूर्ण कालखंड म्हणजे महाराजांच्या (Shivarajabhishek Sohala) अद्भुत प्रतिभेचा, दिव्यत्वाचा, अफाट सामर्थ्याचा साक्षात्कार होय. सर्वसामान्य मावळ्यांच्या बळावर आणि विश्वासावर झालेली ही वाटचाल म्हणजे भावी पिढ्यांसाठी कोरली गेलेली प्रेरणागाथाच होय. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजे ६ जून १६७४ या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक झाला. केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर साऱ्या देशाच्या दृष्टीने ही एक असाधारण गोष्ट होती, एक सुवर्णक्षण होता. या क्षणाने मराठी माणसाच्या आयुष्यात नवीन पहाट उगवली, सामान्य माणसांच्या शक्तीने मदांध सतेला आव्हान दिले जावू शकते हा विश्वास महाराष्ट्राच्या नागरिकांच्या मनात रुजवला गेला. अनेक शतकांचे दास्य निखळून पडले आणि महाराष्ट्र धर्माची पुनःस्थापना झाली. महाराज छत्रपती झाले, शिवराज्यभिषेक शकाचा प्रारंभ झाला, महाराजांच्या दिग्विजयाची आणि मराठा साम्राज्याची ख्याती सर्वत्र निनादू लागली.

हेही पहा – 

महाराजांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण

सन २०२३-२०२४ या वर्षात शिवराज्याभिषेक (Shivarajabhishek Sohala) शक ३५० हा येत आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ही तिथी चालू वर्षात २ जून रोजी येत असून २०२४ मध्ये ही तिथी २० जून रोजी येत आहे. तेव्हा २ जून २०२३ पासून २० जून २०२४ या काळात शिवराज्यभिषेक महोत्सव साजरा करण्यात येईल. या महोत्सवाच्या आयोजनाने महाराजांचे कृतज्ञ स्मरण करणे, त्यांच्या असाधारण कर्तृत्वाचा जागर करणे, त्यातून निर्माण होणाऱ्या उर्जेतून सत्कार्याची वाट उजळणे हा दैवी योग तर साध्य होईलच, पण यासह नव्या पिढीपर्यंत महाराजांचा हा पराक्रमी वारसा पोहोचेल. त्यातून प्रेरणा घेत नवी पिढी सर्वच क्षेत्रात आपल्या प्रतिभेने अग्रेसर राहिल. शिवराज्यभिषेक महोत्सवाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन या संपूर्ण वर्षामध्ये विविध प्रकारचे उपक्रम हाती घेणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.