Coromandal Train Accident : ममता, लालू, नितीश रेल्वेमंत्री असताना झालेले 184 रेल्वे अपघात

देशाचे माजी रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी , नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्या काळातही अनेक अपघात झाले आहेत. ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना 54 रेल्वे अपघात ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना दोन मोठे रेल्वे अपघात झाले होते.

143

ओडिशातील बालासोरमध्ये बंगळुरू-हावडा कोरोमंडल सुपरफास्ट एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला. भरधाव ट्रेन थांबलेल्या मालगाडीवर धडकून पटरीवरुन उतरली. अवघ्या 20 मिनिटांच्या कालावधीत तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातात 280 हुन अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 1000 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातानंतर सरकारने CBI चौकशीचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी काल अपघातस्थळी भेट दिली. रेल्वेमंत्री दोन दिवसांपासून घटनास्थळी उपस्थित असून बचावकार्यानंतर सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. यासोबतच हा अपघात कोणत्या कारणामुळे झाला, याची माहितीही त्यांनी दिली आहे.

इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमुळे हा अपघात झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, देशाचे माजी रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी , नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्या काळातही अनेक अपघात झाले आहेत. ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना 54 रेल्वे अपघात ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना दोन मोठे रेल्वे अपघात झाले होते. तसेच, त्यांच्या काळात एकूण 54 गाड्या एकमेकांवर आदळल्या. 839 गाड्या रुळावरून घसरल्या आणि यात 1451 जणांचा मृत्यू झाला आहे. ममता बॅनर्जी मंत्री झाल्यानंतर अवघ्या 15 महिन्यांत डझनभर मोठ्या रेल्वे अपघातांमध्ये सुमारे 270 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.नितीश रेल्वेमंत्री असताना 79 रेल्वे अपघात बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 19 मार्च 1999 ते ऑगस्ट 1999 पर्यंत म्हणजे फक्त 139 दिवस आणि पुन्हा 20 मार्च 2001 ते 22 मे 2004 पर्यंत म्हणजे 3 वर्षे 63 दिवस रेल्वे मंत्री म्हणून काम केले. त्यादरम्यान 79 रेल्वे अपघात झाले, तर 1000 गाड्या रुळावरून घसरल्या. या अपघातांमध्ये सुमारे 1527 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. ऑगस्ट 1999 मध्ये आसाममध्ये गॅसल ट्रेन अपघातात किमान 290 प्रवासी ठार झाले होते.संबंधित बातमी-  LIC चा मोठा निर्णय; ओडिशा ट्रेन अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना लवकर मिळणार क्लेमलालू यादव रेल्वेमंत्री असताना 51 रेल्वे अपघात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी 22 मे 2004 ते 22 मे 2009 या कालावधीसाठी रेल्वेमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. रेल्वेमंत्री असताना त्यांनी रेल्वेसाठी खूप काम केले, असे त्यांच्याबद्दल बोलले जाते. पण, यादरम्यान 51 गाड्या एकमेकांवर आदळल्या आणि 550 गाड्या रुळावरून घसरल्या. या अपघातांमध्ये 1159 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता.

(हेही वाचा 72 Hoorain : ‘द केरला स्टोरी’ नंतर आता आणखी एक ‘ब्रेनवॉश’ दाखवणारा चित्रपट येतोय ‘७२ हूरें’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.