72 Hoorain : ‘द केरला स्टोरी’ नंतर आता आणखी एक ‘ब्रेनवॉश’ दाखवणारा चित्रपट येतोय ‘७२ हूरें’

‘७२ हूरें’ या चित्रपटाच्या ५२ सेकंदाच्या टीझरमध्ये ओसामा बिन लादेन, अजमल कसाब, याकूब मेमन, मसूद अझहर, हाफिज सईद आणि सादिक सईद यांसारख्या दहशतवाद्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

178

भारतात हिंदू तरुणींचे हिंदू धर्माविषयी असलेल्या अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यांचे ब्रेनवॉश करून त्यांचे इस्लाममध्ये धर्मांतर केले जाते. ही मोडस ऑपरेंडी दाखवण्यात आलेल्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने देशभर खळबळ उडवली. आता भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी तरुणांचे ब्रेनवॉश कसे केले जाते ही मोडस ऑपरेंडी दाखवणारा चित्रपट ‘७२ हूरें’ ’ (72 Hoorain) ७ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.

ट्रिझर लॉन्च 

‘७२ हूरें’ या चित्रपटाच्या ५२ सेकंदाच्या टीझरमध्ये ओसामा बिन लादेन, अजमल कसाब, याकूब मेमन, मसूद अझहर, हाफिज सईद आणि सादिक सईद यांसारख्या दहशतवाद्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. अतिरेक्यांच्या नेत्यांची चिथावणीखोर भाषणाची पार्श्वभूमी या टीझरमध्ये देण्यात आली आहे. या टीझरमध्ये ब्रेनवॉश करताना अतिरेक्यांचे नेते म्हणतात, ‘जो रस्ता तुम्ही स्वीकारला आहे तो तुम्हाला सरळ जन्नतमध्ये पोहोचवणारा आहे, तिथे ७२ कुमारिका मुली तुमच्या सेवेत राहतील.’ यासंदर्भात दहशतवाद हा जगभर चिंतेचा विषय आहे, हे दहशतवादी कोणत्याही इतर ग्रहाचे नाहीत त्यांचा ब्रेनवॉश केल्यामुळे ते जिहादच्या नावाखाली दहशतवादाचा मार्ग पत्करतात, असा दावा निर्मात्यांकडून करण्यात आला आहे. या  चित्रपटाची निर्मिती अशोक पंडित यांनी केली असून, याचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते संजय पूरण सिंह चौहान यांनी केले आहे. चित्रपट ७ जुलै २०२३ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

(हेही वाचा Bihar : नितीश कुमारांचे अपयश : बिहारमध्ये निर्माणाधीन असलेला पूल दुसऱ्यांदा कोसळला )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.