Vaibhav Sooryavanshi : आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीची किंमत ४८ कोटी? खेळाडूंच्या काल्पनिक हस्तांतरणाने सोशल मीडिया हैराण

Vaibhav Sooryavanshi : आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीची किंमत ४८ कोटी? खेळाडूंच्या काल्पनिक हस्तांतरणाने सोशल मीडिया हैराण

76
Vaibhav Sooryavanshi : आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीची किंमत ४८ कोटी? खेळाडूंच्या काल्पनिक हस्तांतरणाने सोशल मीडिया हैराण
Vaibhav Sooryavanshi : आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीची किंमत ४८ कोटी? खेळाडूंच्या काल्पनिक हस्तांतरणाने सोशल मीडिया हैराण
  • ऋजुता लुकतुके

भारतीय प्रीमियर लीग (IPL) २०२६ हंगामानंतर फुटबॉलप्रमाणे खेळाडूंची हस्तांतरण म्हणजेच ट्रान्सफर फी प्रणाली असती, तर कोणत्या खेळाडूला सर्वाधिक किंमत मिळाली असती, यावर सुरू झालेल्या चर्चेत वैभव सूर्यवंशी(Vaibhav Sooryavanshi)सर्वात महागडा भारतीय युवा क्रिकेटपटू ठरला आहे. एका वृत्तपत्राने अशा प्रकारचं सोशल मीडिया सर्वेक्षण केलं होतं. या काल्पनिक विश्लेषणानुसार राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याची संभाव्य ट्रान्सफर किंमत तब्बल ४८ कोटी रुपये इतकी असू शकते.(Vaibhav Sooryavanshi)

वैभव सूर्यवंशीने IPL २०२६ मध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले. अल्पवयात त्याने अनुभवी गोलंदाजांविरुद्ध निर्भय फलंदाजी करत अनेक संस्मरणीय खेळी केल्या. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तो आगामी काळातील भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठ्या प्रतिभांपैकी एक मानला जात आहे. त्यामुळे फुटबॉल ट्रान्सफर मार्केटच्या धर्तीवर मूल्यांकन केले असता त्याची किंमत इतर स्टार खेळाडूंपेक्षा अधिक असल्याचे या विश्लेषणात नमूद करण्यात आले आहे.(Vaibhav Sooryavanshi)

या यादीत वैभव सूर्यवंशीशिवाय साई सुदर्शन, यशस्वी जयसवाल, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांचाही समावेश करण्यात आला आहे. या सर्व खेळाडूंनी २०२६ हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली असून, त्यांच्या फलंदाजीतील गुणवत्ता, सातत्य, नेतृत्वक्षमता आणि व्यावसायिक आकर्षणाचा विचार करून त्यांचे मूल्यांकन करण्यात आले आहे.(Vaibhav Sooryavanshi)

(हेही वाचा – MSRTC Ganpati Bus : कोकणवासीयांची चिंता वाढली! गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी आणि रेल्वेचे आरक्षण फुल्ल )

विश्लेषणानुसार, वैभव सूर्यवंशीची काल्पनिक ट्रान्सफर किंमत ४८ कोटी रुपये, साय सुदर्शनची ४४ कोटी, यशस्वी जैस्वालची ४२ कोटी, शुभमन गिलची ४० कोटी आणि सूर्यकुमार यादवची ३८ कोटी रुपये इतकी असू शकते. अर्थात, ही आकडेवारी प्रत्यक्ष IPL नियमांशी संबंधित नसून केवळ फुटबॉलमधील क्लब ट्रान्सफर मॉडेलच्या आधारावर करण्यात आलेले काल्पनिक मूल्यांकन आहे.(Vaibhav Sooryavanshi)

सध्या IPL मध्ये खेळाडूंची खरेदी-विक्री लिलाव आणि करार व्यवस्थेवर आधारित असते. फुटबॉलप्रमाणे क्लब-टू-क्लब ट्रान्सफर फीची व्यवस्था IPL मध्ये नाही. त्यामुळे ही चर्चा पूर्णपणे काल्पनिक असली, तरी भारतीय क्रिकेटमधील स्टार खेळाडूंचे वाढते व्यावसायिक मूल्य अधोरेखित करणारी आहे.(Vaibhav Sooryavanshi)

विशेषतः वैभव सूर्यवंशीभोवती निर्माण झालेली उत्सुकता भारतीय क्रिकेटमधील नव्या पिढीच्या प्रतिभेचे महत्त्व दर्शवते. अल्पावधीतच त्याने प्रेक्षक, तज्ज्ञ आणि फ्रँचायझींचे लक्ष वेधून घेतले असून, भविष्यात तो IPL मधील सर्वात मोठ्या ब्रँडपैकी एक ठरू शकतो, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू झाली आहे.(Vaibhav Sooryavanshi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.