-
ऋजुता लुकतुके
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या ऑगस्ट महिन्यातील चलनविषयक धोरण समिती (MPC) बैठकीकडे(RBI MCP Meeting)बाजाराचे लक्ष लागले असून, रेपो दरात कोणताही बदल होण्याची शक्यता कमी मानली जात आहे. बहुतांश अर्थतज्ज्ञांच्या मते, RBI सलग चौथ्यांदा रेपो दर ५.२५ टक्क्यांवर कायम ठेवू शकते. वाढती जागतिक अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या किमती आणि देशांतर्गत महागाईचा कल लक्षात घेता RBI सावध भूमिका घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(RBI MCP Meeting)
ऑगस्ट MPC बैठकीत बाजाराचे लक्ष पाच प्रमुख मुद्द्यांकडे असेल. त्यातील पहिला मुद्दा म्हणजे रेपो दरावरील निर्णय. जूनमध्ये किरकोळ महागाई ४.३८ टक्क्यांवर गेली असली, तरी ती RBI च्या उद्दिष्टाप्रमाणे असल्याने तातडीने व्याजदर वाढवण्याची गरज नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.(RBI MCP Meeting)
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धोरणात्मक भूमिकेत बदल होतो का, हा आहे. RBI सध्या तटस्थ भूमिका कायम ठेवण्याची शक्यता आहे. मात्र भविष्यातील महागाईच्या जोखमींबाबत भाष्य अधिक स्पष्ट असू शकते.(RBI MCP Meeting)
(हेही वाचा – India – US Trade Deal : भारत – अमेरिका अंतरिम व्यापारी कराराच्या दिशेने दमदार वाटचाल )
तिसरा मुद्दा म्हणजे महागाईचा अंदाज. अन्नधान्याच्या किमती, मान्सूनची स्थिती आणि जागतिक तेलबाजारातील चढ-उतार लक्षात घेता RBI आपल्या महागाईच्या अंदाजात बदल करते का, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असेल.(RBI MCP Meeting)
चौथा मुद्दा म्हणजे आर्थिक विकासाचा दृष्टिकोन. जागतिक व्यापारातील अनिश्चितता आणि बाह्य जोखमींचा भारताच्या वाढीवर किती परिणाम होऊ शकतो, याबाबत मध्यवर्ती बँकेचे मूल्यांकन महत्त्वाचे ठरणार आहे.(RBI MCP Meeting)
पाचवा मुद्दा म्हणजे आरबीआयचे पुढील मार्गदर्शन (Forward Guidance). ऑक्टोबर किंवा डिसेंबरमध्ये व्याजदरात बदल होण्याची शक्यता, तरलता व्यवस्थापन आणि रुपयाच्या स्थितीबाबत RBI कोणते संकेत देते, यावर रोखे बाजार, शेअर बाजार आणि कर्जदरांची दिशा अवलंबून असेल.(RBI MCP Meeting)
सध्या तरी बाजाराचा कल स्थिती कायम राहील या बाजूने असून, ऑगस्ट पतधोरण बैठकीत व्याजदर स्थिर ठेवत RBI महागाई आणि जागतिक जोखमींबाबत सावध भूमिका कायम ठेवण्याची शक्यता अधिक मानली जात आहे.(RBI MCP Meeting)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

