बहरीन येथील स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱ्या Shaurya Ambure च्या कुटुंबियांशी क्रीडामंत्री कोकाटेंचा संवाद

142
Shaurya Ambure celebrating with the Indian flag after winning silver.
बहरीन येथील स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱ्या Shaurya Ambure च्या कुटुंबियांशी क्रीडामंत्री कोकाटेंचा संवाद
  • प्रतिनिधी 

बहरीन येथे नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत ठाण्याची कन्या शौर्या अंबुरे (Shaurya Ambure) हिने दमदार कामगिरी करत देशाचे नाव उजळवले आहे. १०० मीटर हर्डल्स शर्यतीत केवळ १३.७३ सेकंदांची वेळ नोंदवत तिने रौप्यपदक पटकावले.

(हेही वाचा – BMC Election : पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा ‘मास्टरप्लॅन’ ! हजारो नियुक्त्या, ठाकरेंना देणार मोठा धक्का ?)

राज्याचे क्रीडामंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी शौर्या अंबुरे (Shaurya Ambure) हिच्या अतुलनीय क्रीडाशौर्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कोकाटे यांनी स्वतः अंबुरे कुटुंबियांशी दूरध्वनीवर संवाद साधत त्यांच्या कन्येच्या यशाबद्दल कौतुक व्यक्त केले आणि त्यांचेही अभिनंदन केले.

(हेही वाचा – Hostage : पवई येथील रोहित आर्य ओलीस प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखा करणार)

शौर्याने (Shaurya Ambure) आपल्या निखळ मेहनतीने आणि कौशल्याने महाराष्ट्राचा तसेच देशाचा क्रीडागौरव उंचावला आहे. तिच्या या यशानंतर, मुंबई विमानतळावर आगमनाच्या वेळी मंत्री कोकाटे यांच्या विशेष निर्देशानुसार क्रीडा विभागाच्या वतीने शौर्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. मंत्री कोकाटेंनी सांगितले की, “शौर्या ही महाराष्ट्राच्या तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान आहे. अशा खेळाडूंनीच देशाचे भविष्य उज्ज्वल होते.”

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.