Nikhat, Manika Get Govt Help : निखत झरीन, मनिका बात्रा यांना टॉप्स अंतर्गत सरकारची मदत

Nikhat, Manika Get Govt Help : निखत आणि मनिका यांच्या परदेशात सरावाच्या मागणीला क्रीडा मंत्रालयाने होकार दिला आहे. 

88
Nikhat, Manika Get Govt Help : निखत झरीन, मनिका बात्रा यांना टॉप्स अंतर्गत सरकारची मदत
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिक तीन महिन्यांवर आल्यामुळे आता ॲथलीटनी या महत्त्वाच्या स्पर्धेवर लक्ष केंद्रीत केलं आहे. आणि सरावासाठी परदेश वारीच्या योजनाही आखल्या आहेत. यापैकी मुष्टीयोद्धा निखत झरिन (Nikhat Zareen) आणि टेबलटेनिसपटू मनिका बात्रा (Manika Batra) यांच्या परदेश वारीच्या खर्चाला क्रीडा मंत्रालयाने गुरुवारी मान्यता दिली आहे. ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडिअम योजने’ अंतर्गत या ॲथलीटचा खर्च केला जाणार आहे. (Nikhat, Manika Get Govt Help)

निखत (Nikhat Zareen) बरोबरत प्रीती पवार, परवीन हूडा आणि लवलिना या चार मुष्टीयोद्धा सरावासाठी टर्कीला जाणार आहेत. या चौघींबरोबर त्यांचे प्रशिक्षक आणि वेद्यकीय स्टाफही असणार आहे. तर कुस्तीपटू सुजित, दीपक पुनिया आणि नवीन हे तिघे रशियाला जाणार आहेत. या तिघांना या महिन्याच्या शेवटी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धाही खेळायची आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठीच तिघे रशियाला निघाले आहेत. (Nikhat, Manika Get Govt Help)

(हेही वाचा – IPL 2024 Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी सुपरमॅनचा जंपसूट का घातला आहे?)

‘या’ नेमबाजांचाही परदेश दौरा केंद्र सरकारच्या तिजोरीतून

आशियाई स्पर्धा आणि राष्ट्रकूल स्पर्धेत लांब उडी प्रकारात पदक विजेता खेळाडू श्रीशंकरही डायमंड्स लीग स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सुझाओ आणि दोहाला जाणार आहे. आणि त्याचा खर्चही टॉप योजने अंतर्गत करण्यात येणार आहे. या सर्व खेळाडूंचा प्रवास आणि राहण्याचा खर्च तसंच वैद्यकीय उपचार आणि जेवण्या-खाण्याचा भत्ता असे सगळे खर्च क्रीडा मंत्रालयाकडून करण्यात येणार आहेत. (Nikhat, Manika Get Govt Help)

टेबलटेनिसपटू मनिका बात्रा क्रोएशियात फीडर स्पर्धा खेळण्यासाठी जात आहे. तिला अजूनही मिश्र दुहेरीत ऑलिम्पिक पात्रतेची संधी आहे. एकेरी आणि सांघिक प्रकारात तिची निवड पक्की आहे. या व्यतिरिक्त अनंतजीत सिंग, रझा धिलाँन आणि राजेश्वरी कुमारी या नेमबाजांचाही परदेश दौरा केंद्र सरकारच्या तिजोरीतून होणार आहे. क्रीडा मंत्रालयाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत या सर्व खर्चांना मान्यता देण्यात आली. (Nikhat, Manika Get Govt Help)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.