‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांचे निधन

गेल्या महिन्यात मिल्खा सिंग यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. तेव्हापासून त्यांच्यावर मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु होते.

91

भारताचे महान माजी धावपटू आणि ‘फ्लाईंग सिख’ अशी ओळख असलेले मिल्खा सिंग यांचेअखेर कोरोनामुले निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. कोरोनाची लागण होती, त्यांच्यावर उपचार सुरु होते, त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारी जनरल आयसीयूत ठेवण्यात आले होते, मात्र त्यानंतर मिल्खा सिंग यांना अचानक ताप आला आणि तो वाढत गेला, तसेच त्यांची ऑक्सिजन पातळीही घसरत गेली. त्यामुळे त्यांचे निधन झाले. काही दिवसांपूर्वी मिल्खा यांच्या पत्नीचेही कोरोनामुळेच निधन झाले होते.

महिनाभरापासून सुरु होते उपचार! 

गेल्या महिन्यात मिल्खा सिंग यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. तेव्हापासून त्यांच्यावर मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु होते. आठवडाभर उपचारानंतर त्यांना घरीही सोडण्यात आले होते. घरी परतल्यावर त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली, त्यानंतर त्यांना पीजीआयएमईआर चंदीगडमध्ये  दाखल केले गेले.

(हेही वाचा : शिवसेना म्हणजे देशात हिंदुत्व, राज्यात मराठी! )

मिल्खा यांची कारकीर्द! 

मिल्खा सिंग यांचा जन्म २० नोव्हेबर १९२९ रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये झाला. त्यावेळेस भारत-पाकिस्तान फाळणी झाली नव्हती. १९५८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील २०० आणि  ४०० मीटर प्रकारात त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय खेळाडू ठरले. मिल्खा सिंग यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मॅल्कम स्पेन्सला हरवून ४६.६ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. तर २०० मीटर शर्यतीत त्यांनी पाकिस्तानच्या अब्दुल खालिकचा पराभव केला. मिल्खा यांनी ही धाव केवळ २१.६सेकंदात पूर्ण केली. १९६२मधील जकार्ता एशियन गेम्समध्ये मिल्खा सिंग यांनी ४०० मीटर आणि ४x४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. १९५९मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.