-
ऋजुता लुकतुके
सनरायझर्स हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू अभिषेक शर्माला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यानंतर आयपीएलने दंड ठोठावला आहे. आयपीएलच्या अधिकृत निवेदनानुसार, अभिषेकने आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या २५ टक्के रक्कमेचा दंड आकारण्यात आला असून त्याच्या खात्यात एक डिमेरिट गुणही जमा करण्यात आला आहे. हा गुन्हा ‘लेव्हल १’ प्रकारातील असून मैदानावर अयोग्य आणि अश्लील शब्द वापरल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. अभिषेकने ही चूक मान्य केली असून सामनाधिकऱ्यांचा निर्णय अंतिम मानला गेला आहे.(IPL 2026)
दरम्यान, या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिषेक शर्माने फलंदाजीत मात्र दमदार पुनरागमन केले. त्याने केवळ २१ चेंडूत ४८ धावा करत संघाला झंझावाती सुरुवात करून दिली. ट्रेव्हिस हेडसोबत त्याने अवघ्या ३४ चेंडूत ८२ धावांची सलामी भागीदारी रचली. पुढे हेनरिच क्लासेन (५२) आणि नितिश कुमार रेड्डी (३९) यांच्या योगदानामुळे हैदराबादने २० षटकांत २२६ धावांचा मोठा डोंगर उभारला.(IPL 2026)
(हेही वाचा – )
प्रत्युत्तरात कोलकाता संघाला या धावांचा पाठलाग करताना मोठी अडचण आली. अंगक्रिश रघुवंशीने ५२ धावांची झुंज दिली, मात्र इतर फलंदाज अपयशी ठरले आणि संपूर्ण संघ १६ षटकांत १६१ धावांवर गारद झाला. हैदराबादकडून जयदेव उनाडकटने ३ बळी घेत निर्णायक कामगिरी केली, तर नितीश रेड्डी आणि ईशान मलिंगाने प्रत्येकी दोन बळी घेतले.(IPL 2026)
या विजयासह हैदराबादने ६५ धावांनी दणदणीत यश मिळवले, मात्र अभिषेक शर्माच्या वर्तनामुळे सामन्यानंतर चर्चा रंगली.(IPL 2026)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

