IPL 2024, Virat Kohli : विराट, ख्रिस गेल आणि कायरन पोलार्डचा डान्स करतानाचा व्हीडिओ व्हायरल

IPL 2024, Virat Kohli : आयपीएलचा हा जुना व्हीडिओ इंटरनेटवर पुन्हा फिरतोय 

123
IPL 2024, Virat Kohli : विराट, ख्रिस गेल आणि कायरन पोलार्डचा डान्स करतानाचा व्हीडिओ व्हायरल
IPL 2024, Virat Kohli : विराट, ख्रिस गेल आणि कायरन पोलार्डचा डान्स करतानाचा व्हीडिओ व्हायरल

ऋजुता लुकतुके

आयपीएलने देश विदेशातील क्रिकेटपटू एका संघात आणले. क्रिकेटमध्ये एक वेगळं वातावरण तयार केलं. क्रिकेटच्या चाहत्यांनाही आयपीएलमधून तयार होणाऱ्या या चैतन्याची भुरळ पडली आहे. आयपीएल स्पर्धा क्रिकेट विश्वाला एकत्र आणणारी ठरली आहे. खेळ आणि मनोरंजन यांचा मिलाफ असलेल्या या स्पर्धेचा हाच आत्मा दाखवणारा एक व्हीडिओ सध्या इंटरनेटवर पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. (IPL 2024, Virat Kohli)

(हेही वाचा- IPL 2024, Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजारा या हंगामातच चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणार?)

या व्हीडिओत विराट कोहली, ख्रिस गेल (Chris Gayle), कायरन पोलार्ड (Kieran Pollard) आणि मुथय्या मुरलीधरन (Muthiah Muralitharan) एकत्र नाचताना दिसत आहेत. बंगळुरु संघातील आणखी एक खेळाडू एबी डिव्हिलिअर्स हे नृत्य पाहून टाळ्या वाजवतानाही दिसतोय. (IPL 2024, Virat Kohli)

कोहली, पोलार्ड, गेल आणि मुरलीधरन हे मैदानावर स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, मैदानाबाहेर मात्र ते अशा गोष्टी एंजॉय करताना दिसतात. एकमेकांबरोबर मिसळतानाही दिसतात. दिग्गज खेळाडू क्रिकेट सोडून इतर गोष्टींसाठीही एकत्र येतात. आयपीएल क्रिकेट बरोबरच मनोरंजनाचाही आनंद देते हे अधोरेखित करणारा हा व्हीडिओ मानला जातोय. तो पुन्हा समोर आल्यानंतर काही मिनिटांतच ७० हजारांपेक्षा जास्त लोकांनी तो पाहिला आहे. हजारोंनी लाईक केला आहे.  (IPL 2024, Virat Kohli)

(हेही वाचा- Praful Patel: ४ जूननंतर इच्छुकांसाठी आमची दारं उघडी: प्रफुल पटेल यांचा सुचक इशारा)

हजारो लोकांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. पण, सगळ्यात जास्त प्रतिक्रिया आहेत त्या ‘हा व्हीडिओ डाऊनलोड करून ठेवा.’ (IPL 2024, Virat Kohli)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.