Nana Patole: निवडणुकीआधी नाना काही ना काही षडयंत्र रचतात; परिणय फुकेंचा हल्लाबोल

120
Nana Patole: निवडणुकीआधी नाना काही ना काही षडयंत्र रचतात; परिणय फुकेंचा हल्लाबोल
Nana Patole: निवडणुकीआधी नाना काही ना काही षडयंत्र रचतात; परिणय फुकेंचा हल्लाबोल

परिणय फुकेंनी (Parinay Phuke) नाना पटोलेंवर (Nana Patole) गंभीर आरोप केले आहेत. मागच्या निवडणुकीत नाना पटोलेंनी पुतण्याचं डोकं स्वत: फोडलं होतं. त्यानंतर त्यांनी आपले अश्रू ढाळल्याचा आरोप परिणय फुकेंनी केला आहे. सकोलीच्या सभेत बोलतांना त्यांनी नाना पटोलेंवर (Nana Patole) गंभीर आरोप केला आहे. गेल्या निवडणुकीत नाना पटोलेंनी रडून निवडणुक जिंकल्याचा आरोप परिणय फुकेंनी केलाय. साडेचार वर्षांपासून साकोली विधानसभा क्षेत्रातील (sakoli vidhan sabha) जनता रडत आहे, असे परिणय फुके म्हणाले. (Nana Patole)

नाना पटोले यांनी स्वतःच्या हातानं स्वतःच्या पुतण्याचं डोकं फोडलं

परिणय फुके (Parinay Phuke) म्हणाले, “मागच्या वेळेस (2019 ची विधानसभा निवडणूक) नाना पटोले (Nana Patole) यांनी स्वतःच्या हातानं स्वतःच्या पुतण्याचं डोकं फोडलं आणि आपले अश्रू गाळले, रडत राहिले आणि मतं मागितलं. आपल्या भागातील जनता यांच्या या मगरमच्छ अश्रुला वाहून गेलेत आणि नानांना निवडणुकीत निवडून दिलं. आता साडेचार वर्षांपासून साकोली विधानसभा क्षेत्रातील जनता रडून राहिली. एकही विकास काम नाही झाला, एकही रोजगार निर्मिती झाली नाही.” (Parinay Phuke)

नाना पटोले हे निवडणूक हरणार

“२०१४ मध्ये प्रफुल्ल पटेल यांनी जो भेलचा प्रकल्प आणला त्यालाही रद्द करण्याचं पाप नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं. इथेनॉल बनविण्याचा कारखाना आणला, हे विधानसभेचे अध्यक्ष झाल्यानंतर सगळ्यात पाहिले तो इथेनॉल कारखाना बंद करण्याचं पाप नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं. नाना पटोले (Nana Patole) हे निवडणूक हरणार आहे, हे यांच्या लक्षात येतं, तसं हे निवडणुकीच्या शेवटच्या दोन चार दिवसाआधी काही तरी गडबड करतात, काही ना काही षडयंत्र रचतातय” असेही परिणय फुके म्हणाले. (Parinay Phuke)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.