Maruti Swift 2024 : खास भारतीय बाजारपेठेसाठी बनलेली नवीन मारुती स्विफ्ट कार

Maruti Swift 2024 : नवीन मारुती स्विफ्टचं इंटिरिअर आधीच्या तुलनेत बदलण्यात आलं आहे 

119
Maruti Swift 2024 : खास भारतीय बाजारपेठेसाठी बनलेली नवीन मारुती स्विफ्ट कार
Maruti Swift 2024 : खास भारतीय बाजारपेठेसाठी बनलेली नवीन मारुती स्विफ्ट कार
  • ऋजुता लुकतुके

मारुती स्विफ्टची चौथ्या पिढीतील कार खास भारतीय बाजारपेठेसाठी बनलीय. आणि आता लाँचच्या तयारीत आहे. २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात या कारचं दर्शन लोकांना झालेलं आहे. पण, भारतात मात्र अजून ती लोकांसमोर आलेली नाही. नाही म्हणायला स्विफ्टची हॅचबॅक कार टेस्टिंगसाठी रस्त्यांवर धावताना काहींना दिसली आहे. असा चाचण्यांच्यावेळी दिसलेल्या कारवरून ती कशी असेल याचा चांगला अंदाज बांधता येतो. आधीच्या स्विफ्टच्या मानाने नवीन गाडीच्या इंटिरिअरमध्ये बरेच बदल झाले आहेत. (Maruti Swift 2024)

(हेही वाचा- Swatantrya Veer Savarkar : ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट होत आहे ‘स्लीपर हिट’; विद्यार्थ्यांसाठी खेळ प्रायोजित)

गाडीतील इन्फोटेनमेंट डिस्प्ले ९ इंचांचा आहे. एशी व्हेंट नवीन आणि जास्त प्रभावी आहेत. डॅशबोर्डही नवीन आहे. गाडीचा लुकही थोडाफार बदलला आहे. जुन्या इंग्लिश गाडीचा व्हिंटेज लुक तिला आहे. खासकरून मागच्या बाजूने. गाडीचं ग्रील बदललंय. बंपरही आधुनिक आहे. शिवाय मागच्या सीटचं दार उघडण्यासाठीचं हँडल आता दरवाजालाच देण्यात आलं आहे. (Maruti Swift 2024)

चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गाडीत ६ एअरबॅग आहेत. चालकाच्या सुरक्षेसाठी एबीएस प्रणाली आहे. तर मुलांच्या सीटसाठीही विशेष सुरक्षा आहे. नवीन स्विफ्टचं इंजिनही बदलण्यात आलंय. नवीन गाडीत आहे १.३ पेट्रोल इंजिन, ज्याला ३ सिलिंडर जोडण्यात आलेत. ५ स्पीड मॅन्युअल तसंच ऑटोगिअर बॉक्सचा पर्याय तुम्हाला देण्यात आलाय. भारतात एप्रिल महिन्यात नवीन स्विफ्ट लाँच होऊ शकते. (Maruti Swift 2024)

(हेही वाचा- Praful Patel: ४ जूननंतर इच्छुकांसाठी आमची दारं उघडी: प्रफुल पटेल यांचा सुचक इशारा)

गाडीची किंमत ६ लाख रुपयांपासून सुरू होईल. या गाडीची स्पर्धा असेल ती ह्युंदे आय१० निऑसशी. (Maruti Swift 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.