IPL 2024, Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजारा या हंगामातच चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणार?

IPL 2024, Cheteshwar Pujara : पुजाराच्या एका सोशल मीडिया पोस्टवरून ही चर्चा सुरू झाली आहे 

117
IPL 2024, Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजारा या हंगामातच चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणार?
IPL 2024, Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजारा या हंगामातच चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणार?
  • ऋजुता लुकतुके

भारताचा कसोटी (Test) खेळाडू चेतेश्वर पुजारा पुन्हा एकदा चेन्नई सुपरकिंग्जकडून (CSK) हा हंगाम खेळणार का यावर चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी २०२१ च्या हंगामात चेन्नई फ्रँचाईजीने त्याला करारबद्ध केलं होतं. पण, तो एकही सामना खेळला नव्हता. तसा २०१० पासून पुजारा ४ फ्रँचाईजींकडून आयपीएल खेळलेला आहे. पण, त्याची फलंदाजीची शैली कसोटीला साजेशी असल्यामुळे त्याच्याकडे कधी टी-२० फलंदाज म्हणून गांभीर्याने पाहिलं गेलं नाही. पण, आता त्याच्याच एका पोस्टमुळे एक चर्चा सुरू झाली आहे. (IPL 2024, Cheteshwar Pujara)

(हेही वाचा- C Voter Survey: मोदी सोडून पंतप्रधान म्हणून कोणाला पसंती? सी वोटरचा सर्व्हे आला समोर)

चेतेश्वर या पोस्टमध्ये म्हणतो, ‘सुपरकिंग्ज तुमच्या ताफ्यात दाखल होण्यासठी मी उत्सुक आहे.’ पुढे त्याने पिळदार दंडांचा इमोजीही टाकला आहे. शिवाय त्याने पोस्टमध्ये या हंगामात असंही म्हटलंय. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघात तशी काही हालचाल सुरू आहे की काय अशी ही चर्चा आहे. (IPL 2024, Cheteshwar Pujara)

पुजाराने ही पोस्ट केल्यावर ती लगेच व्हायरल झाली आहे. पुजारा तसंच चेन्नई फ्रँचाईजीचे चाहते त्यावर प्रतिक्रियाही देत आहेत.  (IPL 2024, Cheteshwar Pujara)

(हेही वाचा- Mumbai Lok Sabha Congress : काँग्रेसमध्ये मुंबईतील जागांसाठी नाराजीच; सक्षम उमेदवाराचा शोध चालू)

(हेही वाचा- Swatantrya Veer Savarkar : ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट होत आहे ‘स्लीपर हिट’; विद्यार्थ्यांसाठी खेळ प्रायोजित)

१४ एप्रिलला पुजाराने हे ट्विट केल्यानंतर रविवार संध्याकाळपर्यंत तब्बल १.२ दशलक्ष लोकांनी ते पाहिलं आहे. ७५० पेक्षा जास्तवेळा ते रिट्विट झालं आहे. त्यावर १०,००० लाईक्स आहेत. (IPL 2024, Cheteshwar Pujara)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.