C Voter Survey: मोदी सोडून पंतप्रधान म्हणून कोणाला पसंती? सी वोटरचा सर्व्हे आला समोर

269
C Voter Survey: मोदी सोडून पंतप्रधान म्हणून कोणाला पसंती? सी वोटरचा सर्व्हे आला समोर
C Voter Survey: मोदी सोडून पंतप्रधान म्हणून कोणाला पसंती? सी वोटरचा सर्व्हे आला समोर

देशात लोकसभा निवडणुकीच्या (C Voter Survey) प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्षांनी आपल्या प्रचारसभांचा धडाखा सुरू ठेवला आहे. देशात एकूण ५ टप्प्यात मतदान होणार आहे. ४ जून रोजी जनता कोणाच्या पारड्यात यश टाकते हे स्पष्ट होईल. पण, पंतप्रधान म्हणून देशाची जनता कोणाला किती पसंती देते, याबाबत एक सर्व्हे (C Voter Survey) करण्यात आला होता. यात अर्थातच पहिल्या क्रमांकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे नाव आहे. (C Voter Survey)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब

एबीपी आणि सी वोटरने (C Voter Survey) देशातील पंतप्रधानाच्या चेहऱ्याबाबत एक सर्व्हे केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनाच लोकांची पसंती असेल यावर सर्व्हेतून (C Voter Survey) शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, देशातील इतर काही महत्त्वाच्या नेत्यांना जनता किती पसंती देते याबाबतही निकाल समोर आला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांना जनतेची काही प्रमाणात पसंती मिळाली आहे. (C Voter Survey)

कोणाला किती पसंती ?

सर्व्हेनुसार, (C Voter Survey) ५८ टक्के जनतेने नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून पाहायला आवडेल असं मत दिलं आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राहुल गांधींना (Rahul Gandhi) १६ टक्के जनतेने पसंती दिली आहे. अरविंद केजरीवाल हे यादीमध्ये तिसऱ्या स्थानी आहेत. २ टक्के लोक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना पंतप्रधान म्हणून पाहू इच्छितात. सर्व्हेमध्ये (C Voter Survey) अखिलेश यादव आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना देखील स्थान आहे. अखिलेश यादव हे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासोबत संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आहेत. १ टक्के जनतेने ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान म्हणून पसंत केले आहे. (C Voter Survey)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.