IPL 2024, MI vs RR : मुंबईचा तिलक वर्मा ‘ही’ कामगिरी करणारा सचिनच्या पाठोपाठचा दुसरा भारतीय

IPL 2024, MI vs RR : तिलक वर्मा राजस्थान विरुद्ध अर्धशतक करत मुंबईला निदान पावणेदोनशेचा टप्पा ओलांडून दिला

99
IPL 2024, MI vs RR : मुंबईचा तिलक वर्मा ‘ही’ कामगिरी करणारा सचिनच्या पाठोपाठचा दुसरा भारतीय
IPL 2024, MI vs RR : मुंबईचा तिलक वर्मा ‘ही’ कामगिरी करणारा सचिनच्या पाठोपाठचा दुसरा भारतीय
  • ऋजुता लुकतुके

मुंबई इंडियन्सचा अखेर राजस्थान विरुद्ध पराभव झाला असला (IPL 2024, MI vs RR) तरी संघाचा मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्माच्या (Tilak Verma) नावावर एक नवीन विक्रम नोंदवला गेला आहे. इतकंच नाही तर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) यांच्या मागोमाग तो ही कामगिरी करणारा दुसरा वेगवान भारतीय फलंदाज ठरला आहे. राजस्थान विरुद्ध अर्धशतक पूर्ण करतानाच तिलक वर्माने आयपीएलमधील एक हजार धावा पूर्ण केल्या. आणि ही कामगिरी त्याने केली ती ३३ डावांमध्ये. त्याच्या पुढे सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि ऋतुराज (Rituraj Gaikwad) हे दोन फलंदाज आहेत, ज्यांनी आयपीएलमधील १००० धावा ३१ डावांत पूर्ण केल्या होत्या. (IPL 2024, MI vs RR)

(हेही वाचा- IPL 2024, MI vs RR : रोहित शर्माचा पहिल्याच षटकांत बळी गेला आणि गोलंदाजाच्या नावावर लागला हा विक्रम)

सुरेश रैनाने या कामगिरीसाठी ३४ डाव घेतले होते. तर रिषभ पंत आणि देवदत्त पड्डिकल यांनी प्रत्येकी ३५ डाव घेतले होते. (IPL 2024, MI vs RR)

तिलक वर्मा (Tilak Verma) हा भारताच्या राष्ट्रीय टी-२० संघाचाही सदस्य आहे. आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करून धावसंख्येला आकार देण्याचं काम तो करतो. एकदिवसीय विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेंत तो खेळला आहे. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात १००० धावा पूर्ण करताना त्याने आणखी एक मापदंड ओलांडला आहे. हा टप्पा पार करताना तो २१ वर्षं आणि १६६ दिवसांचा होता. त्यामुळे आयपीएलमध्ये हजार धावा करणारा तो वयाने तिसरा लहान फलंदाज ठरला आहे. (IPL 2024, MI vs RR)

(हेही वाचा- Deepak Kesarkar: विद्यार्थ्यांच्या शाळेची वेळ बदलण्याबाबत आचारसंहितेनंतर निर्णय देणार, शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन)

रिषभ पंत – २० वर्ष २१८ दिवस

यशस्वी जयसवाल – २१ वर्षं १३० दिवस

तिलक वर्मा – २१ वर्ष १६६ दिवस

पृथ्वी शॉ – २१ वर्ष १६९ दिवस 

संजू सॅमसन – २१ वर्ष १८३ दिवस

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा)

राजस्थान विरुद्ध ४५ चेंडूंत ६५ धावांची खेळी खेळताना तिलक वर्माने (Tilak Verma) ३ षटकार आणि ५ चौकार ठोकले. आणि त्याच्या या खेळीमुळेच मुंबई इंडियन्सचा संघ १७९ धावांची मजल मारू शकला.  (IPL 2024, MI vs RR)

तिलक वर्मा (Tilak Verma) फलंदाजीला आला तेव्हा मुंबईची अवस्था २ बाद ६ अशी होती. रोहित आणि इशान किशन हे दोन्ही सलामीवीर मुंबईने गमावले होते. मोहम्मद नबी आणि नेहल वाढेराला हाताशी धरून तिलक वर्माने मुंबईला पावणे दोनशेच्या पार नेलं. अखेर एकोणीसाव्या षटकांत तिलक बाद झाला. (IPL 2024, MI vs RR)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.