IPL 2024, MI vs RR : रोहित शर्माचा पहिल्याच षटकांत बळी गेला आणि गोलंदाजाच्या नावावर लागला हा विक्रम

IPL 2024, MI vs RR : राजस्थानचा तेज गोलंदाज ट्रेंट बोल्टने रोहीत शर्माला पहिल्या षटकात ६ धावांवर बाद केलं 

95
IPL 2024, MI vs RR : रोहित शर्माचा पहिल्याच षटकांत बळी गेला आणि गोलंदाजाच्या नावावर लागला हा विक्रम
IPL 2024, MI vs RR : रोहित शर्माचा पहिल्याच षटकांत बळी गेला आणि गोलंदाजाच्या नावावर लागला हा विक्रम
  • ऋजुता लुकतुके

राजस्थान रॉयल्सचा (IPL 2024, MI vs RR) तेज गोलंदाज ट्रेंट बोल्टने (Trent Boult) सामन्याच्या पहिल्याच षटकात रोहित शर्माला (Rohit Sharma) ६ धावांवर बाद केलं. या बळीसह बोल्टने आयपीएलमधील एक मजेशीर विक्रम आपल्या नावावर केला. बोल्टने राजस्थानला चांगली सुरुवात तर करून दिलीच. शिवाय रोहित सारख्या कसलेल्या फलंदाजाला जम बसण्यापूर्वीच बाद केलं. खुद्द ट्रेंट बोल्टने मागच्या पाच सामन्यांत पहिल्यांदा पॉवरप्लेमध्ये बळी मिळवला. यापूर्वी मुंबई इंडियन्स विरुद्ध वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात बोल्टने पॉवर प्लेमध्ये बळी मिळवला होता.  (IPL 2024, MI vs RR)

(हेही वाचा- Longest Six in Cricket History : क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात लांब मारलेले १० षटकार कुठले?)

बोल्टबरोबरच या बळीचं श्रेय हवेत सूर मारून हा झेल टिपणाऱ्या यष्टीरक्षक संजू सॅमसनलाही जातं. स्विंग झालेल्या चेंडूवर रोहितचा (Rohit Sharma) हा फटका पुरता फसला. चेंडू हवेत उडाला होता. त्याचा अचूक अंदाज घेत सॅमसनने झेल पूर्ण केला. ४ चेंडूत ६ धावा करत रोहीत शर्मा बाद झाला. (IPL 2024, MI vs RR)

ट्रेंट बोल्टने (Trent Boult) सामन्याच्या पहिल्याच षटकांत घेतलेला हा २६ वा बळी होता. या बाबतीत त्याने भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) मागे टाकलं आहे. तर प्रवीण कुमार (Praveen Kumar), दीपक चहर (Deepak Chahar) आणि संदीप शर्मा (Sandeep Sharma) हे या दोघांच्या पाठोपाठ या यादीत आहेत. (IPL 2024, MI vs RR)

(हेही वाचा- PUNE: घरून मतदान करणाऱ्यांसाठी मंगळवारी अर्ज नोंदणीचा शेवटचा दिवस, काय आहेत आयोगाचे आदेश?)

आयपीएलमध्ये पहिल्या षटकांत सर्वाधिक बळी टिपणारे गोलंदाज 

ट्रेंट बोल्ट – २६

भुवनेश्वर कुमार – २५

प्रवीण कुमार – १५

संदीप शर्मा/झहीर खान – १३

दीपक चहर – १२

(हेही वाचा- IPL 2024, RR vs MI : राजस्थान रॉयल्सकडून मुंबईचा ९ गडी राखून धुव्वा)

ट्रेंट बोल्ट (Trent Boult) हा आयपीएलमधील आणि राजस्थान रॉयल्स संघातील एक अनुभवी आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणारा आघाडीचा तेज गोलंदाज आहे. (IPL 2024, MI vs RR)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.