PUNE: घरून मतदान करणाऱ्यांसाठी मंगळवारी अर्ज नोंदणीचा शेवटचा दिवस, काय आहेत आयोगाचे आदेश?

ज्यांना वयोमानाने अथवा व्याधींमुळे मतदान केंद्रापर्यंत सहज पोहोचणे शक्य नाही, अशा ज्येष्ठ नागरिकांचे मतदान तरी घरी जाऊन करवून घेणे आवश्यक आहे.

133
PUNE: घरून मतदान करणाऱ्यांसाठी मंगळवारी अर्ज नोंदणीचा शेवटचा दिवस, काय आहेत आयोगाचे आदेश?
PUNE: घरून मतदान करणाऱ्यांसाठी मंगळवारी अर्ज नोंदणीचा शेवटचा दिवस, काय आहेत आयोगाचे आदेश?

निवडणूक आयोगाने ८५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना घरी बसून मतदान करण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली असली, तरी त्यासाठी अर्ज कुठे करायचा, कोणाशी संपर्क साधायचा याबाबत पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune Lok Sabha Constituency) ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार अनभिज्ञ असल्याचे चित्र दिसत आहे. हा अर्ज करायचा, मंगळवारी, (२३ एप्रिल) शेवटचा दिवस असून, ज्यांना चालणे शक्य नाही, अशाच मतदारांना ही व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Lok Sabha Election 2024)

केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नागरिकांना घरी बसून मतदान करण्याची व्यवस्था निर्माण केल्यानंतर राज्यात या व्यवस्थेचा पहिला वापर कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत झाला होता. त्यावेळी ५५० ज्येष्ठ नागरिक असलेल्या मतदारांनी या व्यवस्थेचा वापर केला होता. पुणे लोकसभेसाठी ८५ वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. ज्यांना मतदान केंद्रापर्यंत जाणे सहज शक्य आहे, त्यांनी मतदान केंद्रावर पोहोचून मतदान करावे, असे निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, ज्यांना वयोमानाने अथवा व्याधींमुळे मतदान केंद्रापर्यंत सहज पोहोचणे शक्य नाही, अशा ज्येष्ठ नागरिकांचे मतदान तरी घरी जाऊन करवून घेणे आवश्यक आहे.

निवडणूक आयोगाचे आदेश?
– ८० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांच्या घरी भेट देऊन त्यांच्याकडून १२ ‘ड’ अर्ज भरून घ्यावा लागणार.
– निवडणुकीचा अध्यादेश आल्यानंतर पाच दिवसांत अर्ज भरून घेणार.
– संबंधित नागरिकांच्या घरी बूथ केंद्र उभारावे लागणार.
– मतदानाचे व्हिडिओ चित्रीकरण करावे लागणार.
– पोलीस बंदोबस्तात नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत मतदान घ्यावे लागणार.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.