IPL 2024, RR vs MI : राजस्थान रॉयल्सकडून मुंबईचा ९ गडी राखून धुव्वा

IPL 2024, RR vs MI : यशस्वी जयसवालने या हंगामातील पहिलं शतक झळकावत विजयात मोठी भूमिका बजावली

91
IPL 2024, RR vs MI : राजस्थान रॉयल्सकडून मुंबईचा ९ गडी राखून धुव्वा
IPL 2024, RR vs MI : राजस्थान रॉयल्सकडून मुंबईचा ९ गडी राखून धुव्वा
  • ऋजुता लुकतुके

या आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्सचा (IPL 2024, RR vs MI) विजयाचा वारु रोखणं दिवसें दिवस कठीण झालं आहे. त्यांचा कुठला ना कुठला फलंदाज धावा करून जातो. संघाला एकहाती विजयही मिळवून देतो. मुंबई विरुद्ध ही जबाबदारी सलामीवीर यशस्वी जयसवालने पार पाडली. आतापर्यंतच्या ७ सामन्यात यशस्वीने चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी मजल मारली नव्हती. आपल्या मोठ्या धावसंख्येसाठी त्याने स्वत:चीच रणजी संघ निवडला. मुंबईने विजयासाठी दिलेलं १८० धावांचं आव्हान राजस्थान रॉयल्सनी ९ गडी आणि ८ चेंडू राखून पूर्ण केलं. यात यशस्वीने ६० चेंडूंत १०४ धावांचं योगदान दिलं. (IPL 2024, RR vs MI)

(हेही वाचा- World Book Day : जागतिक पुस्तक आणि कॉपिराईट दिन साजरा करण्यामागे कोणती उद्दिष्टे आहेत? वाचा सविस्तर)

मुंबईला नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेतल्यावर १७५ धावा करणं जितकं कठीण गेलं, तितकं हे आव्हान राजस्थानसाठी कठीण नव्हतं. कारण, आधीच्याच सामन्यात सूर गवसलेला जोस बटलर (Jos Buttler) आणि यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) यांनी दवाचा फायदा घेत धुवाधार फलंदाजी सुरू केली. आठव्या षटकात जोस बटलर (Jos Buttler) ३५ धावा करून बाद झाला तेव्हा राजस्थानच्या ७४ धावा फलकावर लागलेल्या होत्या.  त्यानंतरही यशस्वीने झंझावात सुरूच ठेवला. (IPL 2024, RR vs MI)

यशस्वीने ६० चेंडूत १०४ धावा करताना ७ षटकार आणि ९ चौकार ठोकले. कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) त्याला चांगली साथ देताना २८ चेंडूंत ३८ धावा केल्या. पियुष चावलाने (Piyush Chawla) मुंबईला बटलरचा एकमेव बळी मिळवून दिला. त्यानंतर यशस्वी (Yashasvi Jaiswal) आणि सॅमसनने शतकी भागिदारी करत संघाला विजयी केलं.  (IPL 2024, RR vs MI)

(हेही वाचा- Central Railway: महिला डब्यांत जून अखेरपर्यंत सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा, सर्वेक्षणानंतर रेल्वे मंडळाने दिली ‘ही’ माहिती)

त्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने ९ बाद १७९ धावा केल्या त्या तिलक वर्माच्या (Tilak Verma) ६५ आणि नेहल वढेराच्या (Nehal Vadra) ४९ धावांच्या खेळीमुळे. मुंबईसाठी पहिल्या दोन षटकांत अनुक्रमे रोहित (Rohit) (६) आणि इशान किशन (Ishan Kishan) (०) माघारी परतले. आणि यातून संघ सावरण्यापूर्वीच चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सुर्यकुमार यादवही (Suryakumar Yadav) (१०) बाद झाला. त्यामुळे मुंबईचा संघ दीडशे करेल की नाही याचीही शाश्वती नव्हती. पण, तिलक वर्माने पाचव्या गड्यासाठी वढेराबरोबर ९९ धावांची भागिदारी करत मुंबईला आधी दिडशे पार. आणि तळाचे फलंदाज बाद होत असतानाही टिकून राहत पावणे दोनशेच्या पार नेलं. (IPL 2024, RR vs MI)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: नाशिकचा तिढा सुटण्याच्या मार्गावर, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेतला ‘हा’ निर्णय)

राजस्थानसाठी संदीप शर्माने (Sandeep Sharma) ४ षटकांत १८ धावा देत ५ बळी मिळवले. तर ट्रेंट बोल्टनेही २ बळी मिळवले. राजस्थानचा ८ सामन्यातील हा सातवा विजय होता. तर मुंबईचा ८ सामन्यातील पाचवा पराभव. (IPL 2024, RR vs MI)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.