World Book Day : जागतिक पुस्तक आणि कॉपिराईट दिन साजरा करण्यामागे कोणती उद्दिष्टे आहेत? वाचा सविस्तर

  जगभरात वाचन, प्रकाशन आणि कॉपीराइट संरक्षणाला प्रोत्साहन देणे अशी आहे. १०० हून अधिक देशांतील शाळा, ग्रंथालये आणि सांस्कृतिक संस्थांमध्ये कार्यक्रम आणि उपक्रम राबवून जागतिक पुस्तक दिन जगभरात लाखो लोक साजरा करतात.

  271
  World Book Day : जागतिक पुस्तक आणि कॉपिराईट दिन साजरा करण्यामागे कोणती उद्दिष्टे आहेत? वाचा सविस्तर

  जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन हा जगभरातील वाचन, प्रकाशन आणि कॉपीराईट संरक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी २३ एप्रिल रोजी साजरा केला जातो. १९९५ मध्ये युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (UNESCO) द्वारे आपल्या समाजाला आकार देण्यासाठी पुस्तकांचे आणि वाचनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस पाळण्यात आला. (World Book Day)

  २३ एप्रिल १६१६ रोजी सर्व्हेंटेस, शेक्सपियर आणि इंका गार्सिलासो दे ला वेगा यांचे निधन झाले होते. त्यामुळे थोर साहित्यिकांना आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन ही वाचनाला, स्थानिक पुस्तकांच्या दुकानांना आणि लायब्ररींना प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो.

  (हेही पहा – Central Railway: महिला डब्यांत जून अखेरपर्यंत सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा, सर्वेक्षणानंतर रेल्वे मंडळाने दिली ‘ही’ माहिती)

  हा दिवस साजरा करण्यामागची कल्पना म्हणजे जगभरात वाचन, प्रकाशन आणि कॉपीराइट संरक्षणाला प्रोत्साहन देणे अशी आहे. १०० हून अधिक देशांतील शाळा, ग्रंथालये आणि सांस्कृतिक संस्थांमध्ये कार्यक्रम आणि उपक्रम राबवून जागतिक पुस्तक दिन जगभरात लाखो लोक साजरा करतात. तसेच भारतात कॉपिराईटच्या बाबतीत फारशी जागृती झालेली नाही.

  मात्र सुधारित कॉपीराईट कायदा १९५७ भारतातील कॉपीराइट कायद्याच्या विषयावर नियंत्रण ठेवतो. हा कायदा २१ जानेवारी १९५८ पासून लागू करण्यात आला आणि तेव्हापासून या कायद्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. कॉपीराईट लेखकांना त्यांच्या निर्मितीवरील अधिकारांचे संरक्षण सुनिश्चित करण्यास मदत करतो, ज्यामुळे सर्जनशीलतेचे संरक्षण होते. मात्र आजही भारतात याविषयी जनजागृती झालेली नाही. २३ एप्रिल हा दिवस या बाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी देखील साजरा केला जातो.

  हेही पहा –

  Join Our WhatsApp Community
  Get The Latest News!
  Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.