Lok Sabha Election 2024: बारामतीमध्ये अपक्ष उमेदवाराला ‘तुतारी’ चिन्ह, शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे धाव

बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे.

130
Lok Sabha Election 2024 : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अनोखा उपक्रम

राज्यासह देशभरात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. अशातच सुरूवातीपासून चर्चेत असलेला बारामती मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी, (२२ एप्रिल) उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यात आली. यावेळी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळाले आहे, तर दुसऱ्या एका उमेदवाराला ‘तुतारी’ हे चिन्ह देण्यात आले आहे. त्यावरून शरद पवार पक्षाने नाराजी व्यक्त केली असून थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Lok Sabha Election 2024)

लोकसभेच्या निवडणूक चिन्ह वाटपात सोयल शहा युनूस शहा शेख या अपक्ष उमेदवाराला ‘तुतारी’ हे चिन्ह देण्यात आले आहे. यावरून शरद पवार पक्षाने नाराजी व्यक्त केली असून थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

(हेही वाचा – IPL 2024, MI vs RR : मुंबईचा तिलक वर्मा ‘ही’ कामगिरी करणारा सचिनच्या पाठोपाठचा दुसरा भारतीय )

बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. बारामतीतील निवडणुकीसाठी एकूण ५० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची २० एप्रिलला पडताळणी झाली. त्यामध्ये पाच अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. तर ४६ अर्ज वैध ठरवण्यात आले होते. त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने बारामती मतदारसंघातून ३८ उमेदवार रिंगणामध्ये राहिले आहेत. या ३८ उमेदवारांना सोमवारी चिन्हांचे वाटप करण्यात आले. दरम्यान बारामती मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या शेख यांनी चिन्हांच्या पहिल्या पसंतीक्रमामध्ये ‘तुतारी’ या चिन्हाची मागणी केली होती. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून तुतारी हे चिन्ह देण्यात आले आहे.

आयोगच याबाबतचा निर्णय घेईल
मात्र बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे या तुतारी फुकणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवत असल्याने तुतारी हे चिन्ह दुसऱ्या उमेदवारास दिल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून याबाबत आक्षेप घेण्यात आलेला आहे.त्यामुळे पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला याबाबतच्या आक्षेपाचा मेल करण्यात आला आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राला वाटप केलेली चिन्हे आहेत. या चिन्हांबाबत काही आक्षेप असल्यास त्यावर जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मला निर्णय घेता येणार नाही. केंद्रीय निवडणूक आयोगच याबाबतचा निर्णय घेईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, डॉ. सुहास दिवसे यांनी सागितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.