Devendra Fadnavis: तोंडाच्या वाफा दवडण्यापलिकडे काही येत नाही, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

90
Devendra Fadnavis: तोंडाच्या वाफा दवडण्यापलिकडे काही येत नाही, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
Devendra Fadnavis: तोंडाच्या वाफा दवडण्यापलिकडे काही येत नाही, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

देशभरात आज (२३ एप्रिल) हनुमान जयंती साजरी केली जात आहे. या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपुरातील गवळीपुरा हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यांनी पूजा आणि आरती केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उपस्थित गर्दीने ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. हनुमंताच दर्शन घेतल्यानंतर उपस्थित पत्रकारांनी त्यांना काय साकडं घातलं? म्हणून प्रश्न विचारला. (Devendra Fadnavis)

बुद्धी आमच्याकरीता आणि विरोधकांकरीता सूबुद्धी मागितली

यावेळी बोलताना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “आज हनुमान जयंती आहे. हनुमान जयंतीच्या पर्वावर नागपुरातल्या प्रसिद्ध टेकडी लाइन हनुमान मंदिरात दर्शन घेतलं. बजरंग बली बुद्धी, शक्ती देतात. त्यामुळे त्यांच्याकडे शक्ती मागितली. जी काही आपल्या राज्यावर, देशावर संकट येतात, ती दूर करण्याची प्रार्थना केली. बुद्धी आमच्याकरीता आणि विरोधकांकरीता सूबुद्धी मागितली.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis)

पराभवाच्या हताशेने शिवीगाळीवर उतरलेत

शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुतिन यांची उपमा दिली. त्यावर पलटवार करताना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “हे सर्वच्या सर्व निराश लोक आहेत. पराभवाच्या हताशेने शिवीगाळीवर उतरलेत. तुम्हाला माहिती आहे, मोदींना जेव्हा जेव्हा शिव्या पडतात, तेव्हा-तेव्हा विजय मोठा असतो. हे जेवढ्या शिव्या देणार, तेवढं लोकं मोदींवर प्रेम करणार” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis)

तोंडाच्या वाफा दवडण्यापलिकडे काही येत नाही

उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) सुद्धा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टीका केली. “उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्रात केलेलं एक काम दाखवा. २५ वर्ष मुंबई महापालिका हातात आहे, तिथे केलेलं काम दाखवा. तोंडाच्या वाफा दवडण्यापलिकडे काही येत नाही.” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. (Devendra Fadnavis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.