IPL 2024, Brian Lara on Suryakumar Yadav : सुर्यकुमारच्या फलंदाजीला ब्रायन लाराने काय नाव दिलंय?

IPL 2024, Brian Lara on Suryakumar Yadav : दुखापतीनंतर सुर्यकुमारने केलेली फलंदाजी पाहून लारा भारावून गेला आहे

124
IPL 2024, Brian Lara on Suryakumar Yadav : सुर्यकुमारच्या फलंदाजीला ब्रायन लाराने काय नाव दिलंय?
IPL 2024, Brian Lara on Suryakumar Yadav : सुर्यकुमारच्या फलंदाजीला ब्रायन लाराने काय नाव दिलंय?
  • ऋजुता लुकतुके

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला या हंगामात पहिल्या तीन सामन्यांत पराभव पत्करावा लागला. पण, त्यानंतर पुढील दोन सामने मुंबई इंडियन्स संघाने ताकदीने जिंकले. तर चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) विरुद्धच्या अल क्लासिको सामन्यातही मुंबईने चांगलं आव्हान उभं केलं. मुंबईच्या पुनरागमनात इशान किशन (Ishan Kishan), रोहित शर्मा यांची फलंदाजी आणि जसप्रीत बुमराची गोलंदाजी यांचा मोठा वाटा होता. पण, वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा मात्र खुश आहे तो मिस्टर ३६० सुर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) कामगिरीवर. (IPL 2024, Brian Lara on Suryakumar Yadav)

(हेही वाचा- IPL 2024, CSK vs MI : २ झेल, तिलक वर्माचा आल्या आल्या चौकार, पथिराणाचं नाट्यमय षटक)

दुखापतीनंतर इतक्या कमी वेळेत अशी नजाकतीने फलंदाजी करणारा फलंदाज पाहिलेला नाही, अशी प्रतिक्रिया ब्रायन लारा यांनी स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात बोलताना दिली आहे. सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हार्नियावरील शस्त्रक्रिया आणि घोट्याच्या दुखापतीनंतर २ महिन्यांनी स्पर्धात्मक क्रिकेट खेळतोय. आयपीएलचे पहिले ३ सामने तो खेळला नव्हता. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. पण, त्याचा खरा जलवा पाहायला मिळाला तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात. १९ चेंडूंत ५० धावा करताना त्याने ५ षटकार आणि ४ चौकार मारले. तसंच मुंबईसाठी दुसऱ्या क्रमांकाचं वेगवान अर्धशतक ठोकलं. (IPL 2024, Brian Lara on Suryakumar Yadav)

या कामगिरीवर बोलताना ब्रायन लारा म्हणतो, ‘टी-२० क्रिकेटमधील बॅटिंग जिनिअस कोण असेल तर तो सुर्यकुमार. मुंबईकडे रोहित, इशान सारखे चांगले आणि फॉर्ममध्ये असलेले फलंदाज आहेत. असे मैदानाच्या सर्व बाजूला मारलेले फटके मी आजतागायत पाहिलेले नाहीत. आणि दुखापतीतून तो पुनरागमन करतोय यावर माझा विश्वासच बसत नाही. सुर्यकुमार मुंबईकडून चांगलंच आव्हान उभं करू शकतो.’ (IPL 2024, Brian Lara on Suryakumar Yadav)

(हेही वाचा- Iran-lsrael Attack : शांतता, सुरक्षेला धोका होईल, असा मार्ग टाळण्याचे भारताचे आवाहन)

३३ वर्षीय सुर्यकुमार टी-२० क्रिकेटमधील सध्याचा नंबर वन फलंदाज आहे. आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत मागचे सहा महिने त्याने अव्वल स्थान कायम राखलं आहे. आणि यात दुखापतीचे दोन महिनेही आले. या प्रकारात पाच आंतरराष्ट्रीय शतकांसह तो शतकांच्या बाबतीतही अव्वल आहे. (IPL 2024, Brian Lara on Suryakumar Yadav)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.