Iran – Israel Tension : इस्रायलवर हल्ला करणाऱ्या IRGCचे सदस्य आहेत इस्लामचे सैनिक

Iran – Israel Tension : इस्लामला असलेला हा विरोध संपवणे हा IRGC चा उद्देश होता. या गटाला नंतर इराणी कायद्यानुसार वैध म्हणून मान्यता देण्यात आली. राजकीय आणि आर्थिक बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचे पुरेसे अधिकारही त्यांना देण्यात आले होते.

134
Iran – Israel Tension : इस्रायलवर हल्ला करणाऱ्या IRGCचे सदस्य आहेत इस्लामचे सैनिक
Iran – Israel Tension : इस्रायलवर हल्ला करणाऱ्या IRGCचे सदस्य आहेत इस्लामचे सैनिक
सायली डिंगरे

इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामुळे जग नव्या युद्धात अडकण्याची भीती निर्माण झाली आहे. मध्य पूर्वेतील देश पुन्हा एकदा अशांततेत आहेत. (Iran – Israel Tension) इस्रायलसारख्या शक्तीशाली देशावर इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (Islamic Revolutionary Guard Corps) नावाच्या एका विशेष दलाने हल्ला केला. युरोपियन युनियन, अमेरिका आणि कॅनडाने इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. दहशतवादी संघटना असलेली इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स नेमकी आहे काय ?

(हेही वाचा – Iran-lsrael Attack : शांतता, सुरक्षेला धोका होईल, असा मार्ग टाळण्याचे भारताचे आवाहन)

इराणमधील इस्लामला असलेला विरोध संपवण्याचा उद्देश

इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सची स्थापना इस्लामिक क्रांतीनंतर लगेचच झाली होती. त्या वेळी त्याचे नाव सिपाह-ए-पासदरन असेही म्हणतात. ते एक सैन्य होते. या सैन्यात ज्यांना देशात इस्लामी क्रांती (Islamic revolution) आणायची होती, त्यांचा समावेश करण्यात आला आहे. इराण हा पूर्वी पुढारलेला देश होता. त्यामुळे इराणमध्ये इस्लामी कायद्यांना खूप विरोध झाला. इस्लामला असलेला हा विरोध संपवणे हा IRGC चा उद्देश होता. या गटाला नंतर इराणी कायद्यानुसार वैध म्हणून मान्यता देण्यात आली. राजकीय आणि आर्थिक बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचे पुरेसे अधिकारही त्यांना देण्यात आले होते.

खामेनी म्हणतात ‘इस्लामचे सैनिक’

इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स हे दल देशाच्या पारंपरिक सैन्यासारखे नसून स्पेशल अल्टरनेटिव्ह फोर्सेससारखे आहे. लष्करप्रमुखांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे एक लाख 90 हजार सक्रिय सैनिक आहेत, जे जमीन, समुद्र आणि हवाई या तिन्ही आघाड्यांवर काम करतात. ते थेट इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंतर्गत येतात. खामेनी त्यांना ‘इस्लामचे सैनिक’ म्हणतात. ते इराणचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि आण्विक कार्यक्रम देखील चालवतात. यावरूनच या दलाच्या सामर्थ्याचा अंदाज लावता येतो.

इस्लामिक गार्ड्स कॉर्प्सच्या झेंड्याखाली अनेक लहान लष्करी गटदेखील कार्यरत आहेत. बसजीचे नाव अनेकदा समोर आले. हे एक निमलष्करी दल आहे. त्याचे काम देशातील सर्वोच्च नेत्याविरुद्धचे कोणतेही आंदोलन चिरडणे, हे त्यांचे ध्येय आहे.

पाकिस्तानच्या सैन्याइतकी मोठी आहे IRGC

परदेशात आपली ताकद वाढवण्यासाठी आय.आर.जी.सी.ने (IRGC) क्वड्स फोर्स नावाचे एक वेगळे दल तयार केले आहे. त्याचे काम लेबनॉनपासून इराक आणि सीरियापर्यंत पसरलेले आहे. एका छोट्या लष्करी गटापासून सुरुवात करून ही संस्था आता देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा हस्तक्षेप करत आहे. क्वड्स फोर्स कॉर्पोरेट लष्कराप्रमाणे काम करते. त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये पैसे गुंतवले आहेत. यामध्ये संरक्षण, तसेच बांधकाम क्षेत्राचा समावेश आहे. बी.बी.सी.च्या अहवालानुसार, देशाच्या अर्थव्यवस्थेत क्वड्स फोर्सचा वाटा एक तृतीयांश आहे. एकंदरित असे गृहित धरले जाऊ शकते की इराणमधील आय.आर.जी.सी.कडे पाकिस्तानच्या सैन्याला त्यांच्या देशात जितके अधिकार आहेत, तितकेच किंवा त्याहून अधिक अधिकार आहेत.

अनेक देशांतील दहशतवादी कारवायांत सामील

इराणच्या विशेष दलांना अमेरिकेने 2019 मध्ये दहशतवादी गट म्हणून घोषित केले होते; कारण ते हिजबुल्लाहसह मध्यपूर्वेत अनेक दहशतवादी संघटना निर्माण करण्यास जबाबदार होते. इराणसह युरोपियन युनियनने आय.आर.जी.सी.वर सौदी अरेबियात (Saudi Arabia) ड्रोन हल्ला केल्याचा आरोप केला आहे, ज्यामुळे तेल साठ्यांचे लक्षणीय नुकसान झाले आहे. इराकमध्ये सहापेक्षा जास्त अमेरिकन सैनिकांच्या हत्येसाठी जबाबदार ठरवत 2019 मध्ये या गटाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे. कॅनडामध्ये या गटाला दहशतवादी मानून त्याच्या झेंड्याखाली काम करणाऱ्या लहान गटांवरही बंदी घालण्यात आली.

एखादा देश एखाद्या विदेशातील एखाद्या गटाला परदेशी दहशतवादी संघटना (एफ.टी.ओ.) तेव्हाच मानतो, जेव्हा तो सतत दहशतवाद निर्माण करत असतो. अशा संघटनांच्या कारवायांमुळे संबंधित देशाचे किंवा तेथील नागरिकांचे अथवा अन्य देशाच्या सीमेचे नुकसान झाले असेल, तरच इतर देशांतील संघटनेला दहशतवादी संघटना, असे म्हटले जाते. (Iran – Israel Tension)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.