IPL 2024, CSK vs MI : २ झेल, तिलक वर्माचा आल्या आल्या चौकार, पथिराणाचं नाट्यमय षटक

IPL 2024, CSK bt MI : पथिराणाने टाकलेलं डावातील आठवं षटक चेन्नईसाठी विजयाची मूर्हूतमेढ रोवणारं ठरलं 

134
IPL 2024, CSK vs MI : २ झेल, तिलक वर्माचा आल्या आल्या चौकार, पथिराणाचं नाट्यमय षटक
IPL 2024, CSK vs MI : २ झेल, तिलक वर्माचा आल्या आल्या चौकार, पथिराणाचं नाट्यमय षटक
  • ऋजुता लुकतुके

विजयासाठी २०७ धावांची गरज असताना मुंबई इंडियन्सचे सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि इशान किशन (Ishan Kishan) षटकामागे १० च्या गतीने धावा करत होते. खासकरून इशान किशन (Ishan Kishan) तर बंगळुरू विरुद्धच्या सामन्यापासून पुढे सुरू अशा थाटातच फलंदाजी करत होता. आणि अशावेळी ऋतुराज गायकवाडने चेंडू मथिशा पथिराणाच्या (Mathisha Pathirana) हातात सोपवला. चेन्नईने आतापर्यंत ६ ते १५ या षटकांमध्ये नियमितपणे चांगली गोलंदाजी केलेली आहे. यात धिम्या गतीने चेंडू टाकणाऱ्या रवींद्र जाडेजाचा मोठा हात होता. पण, यावेळी दुखापतीनंतर संघात पुनरागमन करणारा पथिराणा तारणहार ठरला. (IPL 2024, CSK vs MI)

(हेही वाचा- Nana Patole: निवडणुकीआधी नाना काही ना काही षडयंत्र रचतात; परिणय फुकेंचा हल्लाबोल)

डावाच्या आठव्या षटकात पहिल्याच चेंडूवर त्याने इशान किशनला २३ धावांवर बाद केलं. आणि नंतर आलेल्या सुर्यकुमारला सीमारेषेवर मुसतफिझुरने पकडलं. आधी हे भन्नाट षटक पाहूया, (IPL 2024, CSK vsMI)

श्रींकेच्या मलिंगासारखी गोलंदाजीची शैली असलेला पथिराणा त्याच्याच तालमीत मुंबई इंडियन्स संघात तयार झाला आहे. पण, सध्या तो चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळतो. महेंद्र सिंग धोणीने शैली आणि अचूकता बघूनच त्याची निवड केली होती. ती मुंबई विरुद्ध सार्थ ठरली. आठव्या षटकात पहिल्याच चेंडूवर त्याने इशानला चकवलं. तो आक्रमक फटका खेळणार याचा अंदाज आल्यावर थोडा वाईड चेंडू पथिराणाने टाकला. इशानकडून तो कट करताना चेंडू हवेत उडाला. शार्दूल ठाकूरने हा झेल बरोबर टिपला. (IPL 2024, CSK vs MI)

(हेही वाचा- Maruti Swift 2024 : खास भारतीय बाजारपेठेसाठी बनलेली नवीन मारुती स्विफ्ट कार)

पण, खऱी रंगत आली सुर्यकुमार यादव मैदानात आल्यावर. सुर्यकुमार दुसऱ्याच चेंडूवर मोठा फटका खेळायला गेला. आणि चेंडू डीप थर्डकडे उंच उडाला. खरंतर षटकारच जाणार होता. पण, मुस्तफिझुरने एक हाती झेल टिपला. पण, तो सीमारेषेच्या इतका जवळ होता की, तोल जाऊन तो बाहेरच पडणार होता. प्रसंगावधान राखून मुस्तफिझुरने आधी चेंडू हवेत उडवला. मग तो सीमारेषेच्या बाहेर गेला. आणि पुन्हा आत येत त्याने हवेत चेंडू अलगद पकडला. त्यासाठी मुस्तफिझूरने दाखवलेली चपळाई अचाट होती. त्यानंतर आलेल्या तिलक वर्माने मात्र पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत आपला इरादा स्पष्ट केला होता. पण, त्यालाही पथिराणाने ३१ धावांवर नंतर बाद केलं. पथिराणा सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाज ठरला. त्याने २८ चेंडूंत ४ बळी मिळवले. (IPL 2024, CSK vs MI)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.