Ind vs NZ 3rd ODI : न्यूझीलंड मालिका जिंकली; रोहित ११, गिल २३, श्रेयस ३, राहुल १…गौतम गंभीर जिंकला

48
Ind vs NZ 3rd ODI match highlights with Gautam Gambhir
New Zealand clinches the series against India.

Ind vs NZ 3rd ODI :       तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने २-१ ने गमावली. भारताला घरच्या मैदानावर मात देऊन न्यूझीलंडने मालिका जिंकत मोठी कामगिरी बजावली आहे. तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात टीम इंडियाने निराशाजनक कामगिरी केली. क्षेत्ररक्षणावेळी पाच संधी गमावत न्यूझीलंडला सामन्यावर पकड करण्यास मदत केली. भारताच्या निराशाजनक कामगिरीला संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला जबाबदार धरले जाण्याची शक्यता आहे. अंतिम सामन्यात भारताची सलामीची फळी सपशेल अपयशी ठरली. रोहित शर्मा ११ धावा, कर्णधार शुभमन गिल २३ धावा, श्रेयस अय्यर ०३ धावा, केएल राहुल ०१ धावा अशी सुमार कामगिरी महत्त्वाच्या सामन्यात फलंदाजांनी केली. महत्त्वाचे म्हणजे, विराट कोहलीने एका बाजूने फलंदाजीची धुरा हाती घेत शतकी खेळी केली. आणि संघाच्या विजयाच्या आशा पल्लवीत ठेवल्या. नुकत्याच ओटीटीवर रोहित शर्माची मुलाखत समोर येणार आहे. या मुलाखतीमध्ये रोहित शर्माने भारतीय संघात वारंवार होणारे बदल त्रासदायक ठरत आहेत. त्यामुळे संघातील खेळाडूंची लय बिघडते, हे विधान पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. रोहित शर्माच्या विधानाने आता टीम इंडियाच्या मॅनेजमेंटवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. रोहितच्या विधानाला एक अशीही बाजू म्हणता येईल की, दक्षिण आफ्रिकेसोबत घरच्या मैदानावर टीम इंडियाने सुमार कामगिरी केली होती. दक्षिण आफ्रिकेने भारताला व्हाईट वॉश देऊन, तब्बल दोन दशकांनंतर भारतात कसोटी मालिका जिंकली.(Ind vs NZ 3rd ODI)

कर्णधार शुभमन गिल आणि त्याच्या संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल करत प्रसिद्ध कृष्णाच्या जागी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला संधी दिली. इंदूरच्या होळकर स्टेडियमवरील खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्ग मानली जाते. हा धावांचा जास्त खेळपट्टी आहे. पुन्हा एकदा, तो एक सपाट खेळपट्टी असेल, ज्यामुळे धावा करणे सोपे होईल. नवीन चेंडू सुरुवातीला थोडा स्विंग होऊ शकतो, परंतु जसजसा तो जुना होत जाईल तसतसे धावा काढणे सोपे होईल. या सामन्यादरम्यान हवामानाबाबत, पाऊस अपेक्षित नाही, परंतु दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे, नाणेफेक जिंकणाऱ्या भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, भारतीय संघाने २०१९ पासून घरच्या मैदानावर एकही एकदिवसीय मालिका गमावलेली नाही. दुसरीकडे, न्यूझीलंडने भारतात कधीही एकदिवसीय मालिका जिंकलेली नाही. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्णायक सामन्यासाठी अर्शदीप सिंग अंतिम अकरा संघात परतला.वॉशिंग्टनला पहिल्या सामन्यात घेतला आणि नंतरच्या सामन्यात बसवला.(Ind vs NZ 3rd ODI)

(हेही वाचा नागपूर आता देशाचे ‘डिफेन्स हब’ होणार! संरक्षण मंत्री Rajnath Singh यांच्या हस्ते ‘या’ मोठ्या प्रकल्पाचे उद्घाटन )

एक बाजूला टी २० वर्ल्ड कपमध्ये संघाच्या बाहेर काढलेल्या गिलला चक्क या मालिकेत कर्णधार म्हणून मैदानात उतरवले. या अशा विचित्र निर्णयाने भारतीय संघ या मालिकेत उतरला, संघात याविषयी तीव्र नाराजी आहे हे मैदानात दिसले. मैदानात खेळाडूंमध्ये कुठेही सांघिक भावना दिसली नाही, विराट आणि रोहित क्षेत्ररक्षण करताना चक्क हाताची घडी घालून उभे असलेले दिसले. विजयाची आस दिसली नाही. त्यामुळे गोलंदाजांनी सुमार दर्जाची गोलंदाजी केली. संघ जेव्हा फलंदाजीला उतरला तेंव्हा रोहित, गिल, राहुल, श्रेयस, जडेजा अशा सगळ्या फळीनेच स्वतःची विकेट अक्षरशः देऊन टाकली. एकट्या विराट कोहलीने गरज म्हणून डाव सावरण्याचा प्रयत्न केला, त्याला हर्षित राणा आणि नितीश रेड्डी यांनी साथ दिली, पण त्यांची साथ शेवटपर्यंत मिळाली नाही त्यामुळे अखेर भारताचा डाव २९६ धावांवर आटोपला. सातत्याने संघामध्ये बदल करणे, या गौतम गंभीरच्या वागण्यामुळे भारतीय संघ लय विसरून गेला आहे हे या मालिकेतून दिसून आले आहे. तटी २० विश्व कप च्या आधी संघाचे बिघडलेली लय ही धोक्याची घंटा आहे, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.(Ind vs NZ 3rd ODI)

डावाच्या सुरुवातीलाच रोहित शर्माने मिड-ऑनवरील क्षेत्ररक्षकाला एक सोपा झेल दिला. तर कर्णधार शुभमन गिल काईल जेमिसनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. गिलच्या पुढच्या पॅडला लागून ऑफ-स्टंपवर आदळला. ३३८ धावांच्या या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांनी आपले दोन्ही सलामीवीर लवकर गमावले आहेत. तर मिडल ऑर्डरमध्ये श्रेयस अय्यरची खराब फलंदाजी केली. त्याला वेगवान सुरुवात करता आली नाही आणि काही निर्धाव चेंडू खेळल्यानंतर त्याने गोलंदाजावर जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला. ख्रिश्चन क्लार्कचा चेंडूवर अय्यरने थेट लाँग-ऑनच्या हातात सोपा झेल दिला. त्यानंतर आलेला केएल राहुलदेखील ०१ धावा करून स्वस्तात बाद झाला. त्याच्या विकेटनंतर भारताची धावसंख्या ४ बाद ७१ अशी झाली होती. विराट कोहलीला चांगली साथ देत नितीश रेड्डीने पाचव्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली. नितीश रेड्डीने ५७ चेंडूत ५३ धावा केल्या. त्याने मारलेला फटका शॉर्ट मिडविकेटवर उभ्या असलेल्या विल यंगच्या हातात गेला. ऑल राऊंडर हर्षित राणा ४३ चेंडूंमध्ये ५२ धावा काढून बाद झाला. त्याने विराटसोबत ६९ चेंडूंमध्ये ९९ धावांची भागीदारी केली.(Ind vs NZ 3rd ODI)

गौतम गंभीरने भारतीय संघात वारंवार खेळाडू बदल कधी केले?

भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने भारतीय संघात खेळाडू बदल वारंवार करत आहेच त्याचबरोबर फलंदाजीच्या क्रमात बदल करणे आणि ‘लेफ्ट-राइट’ कॉम्बिनेशन राखण्यासाठी वारंवार खेळाडू बदलणे यावर टीका झाली आहे.

गोलंदाजीतील बदल (२०२६ मधील उदाहरणे) : जानेवारी २०२६ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत अर्शदीप सिंगला पहिल्या दोन सामन्यांत बाहेर बसवून प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली होती. मात्र, तिसऱ्या सामन्यात अर्शदीपचे पुनरागमन झाले आणि त्याने पहिल्याच षटकात विकेट घेतली, ज्यावरून गंभीरच्या निवडीवर माजी खेळाडू आणि चाहत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

युवा खेळाडूंची निवड (वादग्रस्त निर्णय) : जानेवारी २०२६ मध्ये दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदरच्या जागी आयुष बदोनीची झालेली निवड चर्चेचा विषय ठरली. बदोनीची ‘लिस्ट ए’ मधील कामगिरी सरासरी असतानाही त्याला संधी दिल्याने गंभीरवर ‘पक्षपाताचे’ (favouritism) आरोप झाले होते.

नेतृत्वातील बदल : २०२५ मध्ये रोहित शर्माला एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवून शुभमन गिलला कर्णधार बनवण्यात आले, ज्यामध्ये गंभीरची महत्त्वाची भूमिका असल्याचे बोलले जाते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.