Mumbai Crime : मालवणीत एका माथेफिरुचा अनेकांवर चाकुहल्ला; एकाचा मृत्यू, दोघे जखमी

13
Mumbai Crime
Mumbai Crime

Mumbai Crime : हैदराबाद येथून काही आठवड्यापूर्वी आलेल्या रिझवान कुरेशी याने शुक्रवारी सकाळी मालाड मालवणी येथे अनेकांवर चाकूनेहल्ला करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. या चाकू हल्ल्यात १४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून दोनजण जखमी झाले आहे. जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान संतापलेल्या जमावाने या हल्ले खोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मालवणी पोलिसांनी रिझवान कुरेशी याच्या विरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पाणी आणि पैसे मागितल्याच्या कारणावरून हा चाकूहल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी १०.३० च्या सुमारास मालवणी येथील न्यू कलेक्टर्स कंपाउंड, गेट क्रमांक ६ परिसरात घडली. आरोपी रिझवान कुरेशी येथील एका कॅटरिंगच्या दुकानात गेला. त्याने तेथे बसलेल्या १४ वर्षीय बंटी खान याच्याकडे पैसे आणि पिण्याच्या पाण्याची मागणी केली. बंटीने पाणी देण्यास होकार दर्शवला, मात्र पैसे देण्यास नकार दिला. बंटी पाणी आणण्यासाठी आत गेला असता, तो पाणी घेऊन येताच रिझवानने अचानक त्याच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बंटीचा या हल्ल्यात मृत्यू झाला. बंटीच्या वडिलांचे हे दुकान असून कुटुंब वरच्या मजल्यावरच वास्तव्यास आहे.

(हेही वाचा – Veer Savarkar : पुण्याच्या अथश्रीमध्ये दर गुरुवारी भरतो सावरकर साहित्य वाचन वर्ग; जेष्ठ नाट्यनिर्माते अनंत पणशीकर यांची संकल्पना )

बंटीवर वार केल्यानंतर आरोपी त्याच गल्लीतून पुढे निघाला आणि समोरून येणारे चेतन पटेल यांच्या गळ्यावरही त्याने चाकूने वार केले. गंभीर जखमी झालेल्या पटेल यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

स्थानिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

दोन जणांवर वार केल्यानंतर आरोपी रिझवान आणखी एका घरावर हल्ला करण्याच्या तयारीत होता. मात्र, आरडाओरड ऐकून जमलेल्या परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत त्याला जागेवरच पकडले आणि चोप दिला. त्यानंतर तात्काळ मालवणी पोलिसांना पाचारण करून आरोपीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा उत्तर प्रदेशचा असलेला रिझवान कुरेशी हा सुमारे १० दिवसांपूर्वीच मालवणीत आला होता. यापूर्वी तो पुणे आणि हैदराबाद येथेही राहिला होता. चौकशीदरम्यान तो पोलिसांना दिशाभूल करणारी उत्तरे देत असून त्याच्या दाव्यांची पडताळणी केली जात आहे. मालवणी पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून बंटीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.