Veer Savarkar : पुण्याच्या अथश्रीमध्ये दर गुरुवारी भरतो सावरकर साहित्य वाचन वर्ग; जेष्ठ नाट्यनिर्माते अनंत पणशीकर यांची संकल्पना

अनंत पणशीकर म्हणाले की ‘अथश्री या वसाहतीमध्ये जे जेष्ठ नागरिक राहतात त्यांच्यामध्ये जवळपास सर्वच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे  (Veer Savarkar)  प्रेमी आहेत. त्यामुळे सावरकरांच्या जयंतीदिनी म्हणजे प्रत्येक वर्षी २८ मे रोजी या वसाहतीमधील सर्व नागरिक एकत्र येऊन सावरकरांचे साहित्य वाचतात.

8

स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) हे हिंदुत्वप्रेमींचे दैवतच. सावरकरांचे साहित्य, त्यांच्या विचारांच्या प्रचार आणि प्रसारासाठी हजारो लोक कायमच प्रयत्न करत असतात. यातीलच एक महत्त्वाचे नाव म्हणजे जेष्ठ नाट्यनिर्माते अनंत पणशीकर. पुण्यातील जेष्ठ नागरिकांची वसाहत म्हणून प्रसिद्ध असलेल्या अथश्रीमध्ये अनंत पणशीकर यांच्या पुढाकाराने एक अभिनव उपक्रम साकारण्यात आला आहे. या उपक्रमात दर गुरुवारी सावरकरांच्या साहित्याचे वाचन केले जाते. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात सावरकरांनी  (Veer Savarkar)   लिहिलेल्या सहा सोनेरी पाने या पुस्तकाचे वाचन करण्यात आले.

savarkar 11

 

या उपक्रमाची पार्श्वभूमी सांगताना अनंत पणशीकर म्हणाले की ‘अथश्री या वसाहतीमध्ये जे जेष्ठ नागरिक राहतात त्यांच्यामध्ये जवळपास सर्वच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे  (Veer Savarkar)  प्रेमी आहेत. त्यामुळे सावरकरांच्या जयंतीदिनी म्हणजे प्रत्येक वर्षी २८ मे रोजी या वसाहतीमधील सर्व नागरिक एकत्र येऊन सावरकरांचे साहित्य वाचतात. या वर्षी हे साहित्यवाचन दर आठवड्याला एक दिवस अशा पद्धतीने करायचे ठरवून सावरकरांच्या सहा सोनेरी पाने या ग्रंथाचे वाचन सुरु केले. यावेळी सावरकर जयंतीच्या दिवशी गुरुवार असल्याने, दर आठवड्याला गुरुवारी हे वाचन करण्याचे ठरवले. १५ नागरिकांनी एकत्र येऊन १५ गुरुवार हे वाचन केले. अशा पद्धतीने हा उपक्रम सुरु झाला आहे.’

WhatsApp Image 2026 09 18 at 4.40.10 PM

हा उपक्रम चांगलाच लोकप्रिय झाला असून अनेकांनी भावपूर्ण प्रतिक्रिया दिल्या आहेत. या वाचन उपक्रमात सहभागी झालेल्या अनेक जेष्ठ नागरिकांना त्यांच्या पूर्वायुष्यात सावरकरांचा  (Veer Savarkar) सहवास लाभला होता. त्या आठवणीही ताज्या झाल्या, काहींनी आतापर्यंत कधीही न शिकवला गेलेला इतिहास अनुभवायला मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा इतिहास हे साहित्य त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार देखील व्यक्त केला आहे. हे या उपक्रमाचे सर्वात मोठे यश आहे. गणेशोत्सवातील दहा दिवस हा उपक्रम बंद राहणार आहे, परंतु लगेच त्याच्या पुढच्या गुरुवारपासून हे वाचन सुरु होणार आहे. सहा सोनेरी पाने या ग्रंथानंतर आता माझी जन्मठेप ग्रंथाचे वाचन सुरु होणार आहे. अशा पद्धतीचा हा अभिनव उपक्रम आहे.  (Veer Savarkar)

(हेही वाचा FSSAI कडून नेस्लेच्या बालकांसाठीच्या दुधावर कारवाई; खोटे दावे केल्याचा आरोप)

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ‘सावरकर साहित्य वाचन’ उपक्रम

नागरिकांना सशक्त आणि अखंड भारताच्या उभारणीसाठी प्रेरणा मिळावी या उद्देशाने, दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात दर गुरुवारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar) यांच्या साहित्याचे सामूहिक वाचन व चर्चा घडवून आणणारा विशेष उपक्रम राबवला जात आहे. भारताचा जाज्वल्य इतिहास आणि सांस्कृतिक वारशाची सखोल माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, स्वातंत्र्यवीरांच्या प्रखर विचारांतून देशभक्तीची भावना अधिक दृढ करणे तसेच समविचारी व्यक्तींशी संवाद साधून राष्ट्रहिताच्या विषयांवर खुली चर्चा घडवून आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

दर गुरुवारी सायंकाळी ५:३० ते ६:३० या वेळेत स्मारकाच्या सभागृहात हा वाचन वर्ग उपक्रम राबवला जातो. या उपक्रमात राष्ट्रप्रेमी नागरिकांनी आणि तरुणांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीपाद काळे यांनी केले आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी अधिक माहितीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक (+91 22 2446 5877) किंवा श्रीपाद काळे (9869447431) यांच्याशी संपर्क साधावा.  (Veer Savarkar)

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.