प्रसिद्ध संगीतकार Ilaiyaraaja यांना ‘पद्मपाणि’ पुरस्कार जाहीर

50
पद्मविभूषण इलयाराजा हसत आहेत.
इलयाराजा यांना 'पद्मपाणि पुरस्कार' जाहीर.

जागतिक दर्जाचे चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणारा अकरावा ‘अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ (AIFF 2026) २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. या दिमाखदार सोहळ्यात भारतीय चित्रपट संगीताला जागतिक स्तरावर नवी उंची मिळवून देणारे ज्येष्ठ संगीतकार पद्मविभूषण इलयाराजा (Ilaiyaraaja) यांना प्रतिष्ठित ‘पद्मपाणि पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. महोत्सवाचे मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर आणि संयोजन समितीने ही अधिकृत घोषणा केली आहे. (Ilaiyaraaja)

(हेही वाचा – Amazon Rainforest : ‘पृथ्वीचे फुफ्फुस’ अशी ओळख असलेल्या वर्षावनातील दुर्मिळ जमात पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद)

इलयाराजा यांचे अतुलनीय योगदान
गेल्या पाच दशकांपासून इलयाराजा यांनी भारतीय सिनेसृष्टीत आपले सुवर्णयुग निर्माण केले आहे. त्यांनी आतापर्यंत १५०० हून अधिक चित्रपटांना संगीत दिले असून ७ हजारांहून अधिक गाण्यांची निर्मिती केली आहे. तामिळ, तेलगू, हिंदी आणि मराठी अशा विविध भाषांमधील त्यांच्या संगीतरचनांनी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. त्यांच्या संगीतातील शास्त्रीय शिस्त आणि मानवी संवेदनांमुळे त्यांना ‘इसैग्नानी’ म्हणजेच संगीत क्षेत्रातील ऋषी मानले जाते.

(हेही वाचा – Bhandara Crime : पवनी-भावड येथील हिंदूदेवतेच्या मुर्तीची विटंबना! मोर्चा काढत स्थानिकांकडून कारवाईची मागणी)

पुरस्काराचे स्वरूप आणि निवड समिती
पद्मपाणि पुरस्काराचे स्वरूप २ लाख रुपये रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे आहे. ज्येष्ठ समीक्षक लतिका पाडगांवकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने ही निवड केली आहे. या समितीमध्ये दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, सुनील सुकथनकर आणि चंद्रकांत कुलकर्णी यांसारख्या मान्यवरांचा समावेश होता. २८ जानेवारीला सायंकाळी ५:३० वाजता एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृहात हा गौरव सोहळा पार पडेल.

हेही पहा –


Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.