Ind vs Eng 5th Test : यशस्वी जयस्वालने मोडला विराटचा ‘हा’ विक्रम

यशस्वी या मालिकेत भारताचा सगळ्यात यशस्वी फलंदाज ठरला आहे. 

136
Ind vs Eng 5th Test : यशस्वी जयस्वालने मोडला विराटचा ‘हा’ विक्रम
  • ऋजुता लुकतुके

खेळांमध्ये विक्रम हे मोडण्यासाठीच असतात असं म्हटलं जातं. आणि सध्या ज्या फॉर्ममध्ये यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आहे ते पाहता तो आपल्या प्रत्येक डावात नवीन विक्रम रचतो आहे. याच मालिकेत सलग दोन कसोटींत शतक झळकावून तो विराट कोहली, विनोद कांबळी अशा दिग्गज फलंदाजांच्या पंक्तीत जाऊन बसला. त्यानंतर एकाच मालिकेत ६०० च्या वर धावा करत तो सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर यांच्या सारख्या दिग्गजांच्या रांगेत विराजमान झाला. आता आणखी एका बाबतीत त्याने विराट कोहलीला मागे टाकलं आहे. आणि सुनील गावसकर यांचाही तो एका विक्रमासाठी पाठलाग करत आहे. (Ind vs Eng 5th Test)

धरमशाला कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय डाव सुरू झाला तेव्हा सगळ्यांचं लक्ष यशस्वीवर होतंच. आणि त्यानेही लोकांना निराश केलं नाही. ५७ चेंडूंच्या धुवाधार खेळीनंतर चुकीचा फटका खेळून तो बाद झाला. पण, त्यापूर्वी या मालिकेत त्याने ७०० धावांचा टप्पा ओलांडला. आणि त्याचबरोबर विराट कोहलीला मागे टाकलं. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम यापूर्वी विराटच्या नावावर होता. २०१६ मध्ये भारतातील मालिकेतच विराटने ६५५ धावा केल्या होत्या. (Ind vs Eng 5th Test)

(हेही वाचा – Ind vs Eng 5th Test : धरमशालात ५ बळी मिळवणाऱ्या कुलदीपने बुमरालाही टाकलं मागे)

या कसोटीत भारतीय संघ दुसरा डाव खेळला तर यशस्वीला (Yashasvi Jaiswal) आणखी एका विक्रमाची संधी आहे. एका मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा सुनील गावसकर यांचा विक्रम तो मोडू शकतो. गावसकर यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध ७७४ धावा केल्या होत्या. अर्थात, त्यासाठी यशस्वीला आणखी ६३ धावा कराव्या लागतील. (Ind vs Eng 5th Test)

दरम्यान यशस्वीने (Yashasvi Jaiswal) कसोटी कारकीर्दीत १,००० धावांचा टप्पा पार केला आहे. आणि हा टप्पा पार करण्यासाठी यशस्वीने १६ डाव घेतले. आणि या बाबतीत एकटा विनोद कांबळी यशस्वीच्या पुढे आहे. विनोदने १४ डावांमध्ये हजार धावांचा टप्पा पार केला होता. वयाचा निकष लावला तर यशस्वी चौथा लहान फलंदाज ठरलाय. त्याने २२ वर्षं आणि ७० दिवसांचा असताना १,००० कसोटी धावा पूर्ण केल्या. तर सचिन तेंडुलकरने हा टप्पा १९व्या वर्षी, कपिल देव आणि रवी शास्त्री यांनी २१ व्या वर्षी आणि दिलीप वेंगसरकर यांनी १,००० धावा पूर्ण करण्यासाठी २२ व्या वर्षी पार केला होता. (Ind vs Eng 5th Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.